दुर्गम आदिवासीबहुल सुरगाणा येथील दिलीप खांडवी याने अल्पावधीतच खो-खो क्रीडा प्रकारात चुणूक दाखविली आहे. लक्षवेधी कामगिरी करताना त्याने संघाला पदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय संघात खेळण्याचे ध्येय बाळगताना तो जिद्द, कष्ट करताना मैदानावर कसून सराव करतोय. ‘छोटा पॅकेट, बडा धमाका’ अशी त्याची अनोखी ओळख संपूर्ण भारतात निर्माण झाली आहे.