दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समितीने अहवाल प्रशासनाकडे सोपवला, ठेकेदार अन् अधिकाऱ्यांवर ठपका; रस्त्याचे काम अपूर्ण

Dindori Accident News: दिंडोरी अपघात प्रकरणी ५ जणांच्या चौकशी समितीने प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. यात ठेकेदारासह प्रशासनातील अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होणार पहावे लागेल.
Dindori Accident

Nashik News

Esakal

Updated on

Dindori Accident News: नाशिकमधील दिंडोरी इथं रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहीरीत कार कोसळून भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी चौकशी समितीने प्रशासनाला अहवाल सादर केला आहे. या अहवालात ठेकेदारासह अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आल्याची माहिती समोर आलीय. रस्ता विहिरीच्या काठापर्यंत बांधण्यात आला होता. त्याठिकाणी विहीर धोकादायक स्थितीत होती. रस्त्यात ना फलक होते, ना विहिरीशेजारी कठडा, तसंच स्पी ब्रेकरही नव्हता. यामुळे रात्रीच्या वेळी गाडी थेट विहिरीत कोसळून अपघात झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com