Dindori APMC : दिंडोरीत सभापतीपदी कड, कैलास मावळ उपसभापती

Former MLA Ramdas Charoskar felicitating after unopposed election of Chairman and Deputy Chairman of Market Committee
Former MLA Ramdas Charoskar felicitating after unopposed election of Chairman and Deputy Chairman of Market Committeeesakal

Dindori APMC : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रशांत कड यांची, तर उपसभापतीपदी कैलास मवाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Dindori APMC Chairman Kad Kailas Maval Vice Chairman nashik news)

बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सर्वपक्षीय परिवर्तन पॅनलला अकरा, दत्तात्रय पाटील व प्रवीण जाधव यांच्या शेतकरी उत्कर्ष पॅनलला पाच जागा मिळाल्या, तर व्यापारी गटातून दोन संचालक निवडून आले होते.

बुधवारी (ता. २४) बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत विघ्ने यांचे उपस्थितीत सभापती- उपसभापती निवडीसाठी विशेष सभा झाली. या वेळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

परिवर्तन पॅनल व व्यापारी गटातील एकुण तेरा संचालक या वेळी उपस्थित होते. शेतकरी उत्कर्ष पॅनलचे पाच संचालक मात्र अनुपस्थित होते. बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके फोडून व गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Former MLA Ramdas Charoskar felicitating after unopposed election of Chairman and Deputy Chairman of Market Committee
Success Story : स्वत: शेतमजूरी करत अश्‍विनी पोलिस दलात!

जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, सुरेश डोखळे, सुनील पाटील, प्रकाश शिंदे, अविनाश जाधव, विलास कड, सुरेश कळमकर, माधव साळुंखे, नामदेव घडवजे, विलास घडवजे, तुकाराम जोंधळे,

विश्‍वासराव देशमुख, भाऊसाहेब बोरस्ते, नरेंद्र जाधव, गंगाधर निखाडे, योगेश बर्डे, दत्तू भेरे, पांडुरंग गडकरी, दत्तू राऊत, काका चौधरी, बंडू भेरे, गोपीनाथ गांगुर्डे, महेंद्र बोरा, विक्रम मवाळ, माणिक उफाडे, दशरथ उफाडे, रतन बस्ते, अरुण अपसुंदे, जमीर शेख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"सर्व संचालकांना सोबत घेत बाजार समितीत शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकरी हिताला प्राधान्य देवून बाजार समितीच्या विकासासाठी कटिबद्ध राहून, बाजार समितीचा नावलौकिक वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू."

-प्रशांत कड, नवनिर्वाचित सभापती

"बाजार समिती आवारात शेतकऱ्यांना विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शेतकरी व व्यापारी यांच्यात समन्वय ठेवून शेतकरी हिताला प्राधान्य दिले जाईल. विविध उपबाजारांचा विस्तार करत, नवीन बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल."

-कैलास मवाळ, नवनिर्वाचित उपसभापती

Former MLA Ramdas Charoskar felicitating after unopposed election of Chairman and Deputy Chairman of Market Committee
Nashik News: नामफलकांच्या आड नेमकं दडलंय काय? सामाजिक कार्यकर्ते निलेश चिखले यांच्यासह नागरिकांचा सवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com