

9 Dead After Car Falls Into Well in Dindori
Esakal
दिगंबर पाटोळे, दिंडोरी : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं शुक्रवारी रात्री उशिरा भरधाव कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांाच मृत्यू झाला. इंदोरे गावचं कुटुंब त्यांच्या घरातील मुलांच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी दिंडोरीत आलं होतं. ते परतताना रात्री १० वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या विहिरीत कार कोसळली. अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून रस्त्याच्या मधोमध असलेली विहिरी बुजवण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या कित्येक वर्षांपासून ही विहीर वापरात असून प्रशासनाकडून रस्त्याचं बांधकाम केलं तेव्हा याकडे कसं दुर्लक्ष झालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.