

Sudden Ambush: Leopard Attacks Farmer While Tying Calf in Cattle Shed
Sakal
वणी : दिंडोरी तालुक्यातील वणी परीसरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाच; पिंपळणारे येथे आज सकाळी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. आपल्या शेतात वासरू बांधत असलेल्या ६९ वर्षीय वृद्ध शेतकऱ्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यु झाला आहे. गुलाब रामभाऊ साळवे असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पिंपळणारे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.