Dindori lok sabha Election cpim JP Gavit  withdraws from dindori j sharad pawar lok sabha 2024
Dindori lok sabha Election cpim JP Gavit withdraws from dindori j sharad pawar lok sabha 2024

Dindori Lok Sabha Election 2024 : 'मविआ'ला मोठा दिलासा! दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपची उमेदवारी मागे

Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु या जागेवरून माकपने देखील उमेदवार जाहीर केल्याने संभ्रमाची स्थिती निर्णाण झाली होती. मात्र आज येथे कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)ने या मतदारसंघातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. यासोबत महाविकास आघाडीच्या उमेदवारास माकपने सक्रिय पाठिंबा देखील दिला आहे. यामुळे मविआला मोठा दिलासा मिळाला आहे.

माकपने जेपी गावीत यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली होती. तसेच येथे महाविकास आघाडीने त्यांच्या पक्षाच्या उमेदवारास अधिकृतपणे पुरस्कृत करावे, अशी माकपची मागणी होती. त्यासाठी राज्य आणि केंद्रीय स्तरापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील ४८ पैकी केवळ ही एकच जागा पक्षास मिळावी, अशी माकपची मागणी होती. मात्र, पक्षाच्या या प्रयत्नांना यश आले नाही. महाविकास आघाडीने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षास दिली.

Dindori lok sabha Election cpim JP Gavit  withdraws from dindori j sharad pawar lok sabha 2024
Nashik Lok Sabha Constituency : गोडसे, भगरेविरोधातील तक्रारी निकाली; छाननीअंती नाशिक मतदारसंघातून 36 जणांचे अर्ज वैध

जनतेच्या संभाव्य कौलाचा अवमान होऊ नये, तसेच भाजप उमेदवाराचा पराभव आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय यावर शिक्कामोर्तब करणे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे माकप कडून सांग्यात आले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी (अज) लोकसभा मतदारसंघातील जे. पी. गावीत यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या माकपच्या राज्य सचिवमंडळाच्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव करण्यासाठी मविआचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांना मतदारांनी मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीने केले आहे.

Dindori lok sabha Election cpim JP Gavit  withdraws from dindori j sharad pawar lok sabha 2024
Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com