
Dindori police team takes firm action against two youths accused of creating panic in the area.
Sakal
-दिगंबर पाटोळे
वणी: सध्या " नाशिक जिल्हा म्हणजे कायद्याच्या बालेकिल्ला " या वाक्याने गुन्हेगारांच्या छातीत धडकी भरवली आहे. शहराबरोबरच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क करत कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मग दिंडोरी पोलीस स्टेशन तरी मागे कसे राहणार ? दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी तालुक्यातील आंबेगण येथे हातात कोयते घेऊन दहशत पसरवणाऱ्या दोन युवकांना चांगलीच अद्दल घडवली.