वणी: दिंडोरी पंचायत समितीतील जिल्हा परिषद ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता (वर्ग १) योगेश नारायण घारे आणि कनिष्ठ अभियंता (वर्ग ३) मनीष कमलाकर जाधव यांना दोन लाख १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक युनिटच्या पथकाने केली असून, याबाबत दिंडोरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.