Nashik News : नापास झाल्याने डिप्लोमा विद्यार्थिनीची आत्महत्या

death
deathesakal

Nashik News : नाशिक रोड परिसरातील १९ वर्षीय विद्यार्थिनीने डिप्लोमाच्या अखेरच्या वर्षात तीन विषयात नापास झाल्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होते आहे. (Diploma student commits suicide due to failure Nashik News )

मृणाल काशिनाथ जाधव (१९, रा. एमएसईबी कार्यालयाजवळ, आदर्शनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. मृणाल ही मातोश्री पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती.

तिने तिसऱ्या वर्षाचे पेपर दिले असता निकाल लागल्यावर तीन विषय नापास झाल्याने ती नैराश्यात होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे तिने शुक्रवारी (ता. ४) घरी असताना सायंकाळी साडेपाचपूर्वी गळफास लावून घेतला. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. भाऊ १५ वर्षांचा असून वडील मुंबईत खासगी नोकरी करतात.

घटनेची माहिती कळताच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे, सहायक निरीक्षक चौधरी व पोलिस नाईक एस. ए. हिवाळे दाखल झाले. अंमलदारांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला. उपनगर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

death
Crime News : दहा रुपयांमध्ये दारू मिळते का? या प्रश्नाने घेतला जीव...तरुणाचा दुर्दैवी अंत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com