
नाशिक : २२ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालक शौर्यपदक जाहीर
नाशिक : महाराष्ट्र पोलिस विभागात (Maharashtra Police Department) विविध प्रकारच्या विभागामध्ये प्रशंसनीय आणि उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील २२ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालक शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. (In the Maharashtra Police Department, 22 Police Officers and staff have been awarded the Director General of Police Medal of Valor.)
पदकप्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
राज्यात दरवर्षी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक शौर्यपदक देवून गौरविले जात असते. मागीलवर्षी कोरोनामुळे हे पदक जाहीर होवू शकले नव्हते. चालूवर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर २०२१ मधील पुरस्कार पोलिस महासंचालक यांच्यातर्फे राज्यातील ८०० पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे. या पुरस्कारार्थीमध्ये जिल्ह्यातील २२ अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असून या सर्वांना पोलिस महासंचालक शौर्यपदक जाहीर झाले आहे. रविवारी (ता.१) महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din) पालकमंत्री (Guardian Minister) यांच्या उपस्थितीत पदकप्राप्त अधिकारी व कर्मचारी यांना बोधचिन्ह/सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.
हेही वाचा: मराठमोळ्या ओमकारचा अमेरिकेत डंका; पटकावली तब्बल १३७ पदकं
जिल्ह्यातील पुरस्कारार्थी पोलिस अधिकारी व कर्मचारी
नारायण न्याहळदे (पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), महादेव खंडारे (पोलिस निरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी), डॉ. अंचल मुदगल (पोलिस निरीक्षक, नाशिक शहर), श्रीकांत निंबाळकर (पोलिस निरीक्षक, नाशिक शहर), अब्दुल राजेख अब्दुल खालेद शेख (सहा. पोलिस उपनिरीक्षक, महाराष्ट्र पोलिस अकादमी), सतीष जाधव (सहा. पोलिस उपनिरीक्षक, नाशिक शहर), विलास वाघ (सहा. पोलिस उपनिरीक्षक, नाशिक), संदीप सोनवणे (सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, डीटीएस, नाशिक), बाळू लभडे (पोलिस हवालदार, शहर), नितीन संधान (पोलिस हवालदार, शहर), रवींद्रकुमार पानसरे (पोलिस हवालदार, शहर), संगीता वाघमारे (पोलिस हवालदार, डीटीएस शहर), सुनील कुलकर्णी (पोलिस हवालदार), राहूलन जगझाप, यतिनकुमार पवार, इम्रोद्दीन मुल्ला, अनिल गोरे, अश्विनी देवरे, एकनाथ बाविस्कर (लाचलुचपत प्रतिबंधक, नाशिक), भालचंद्र खैरनार, प्रवीण वाघमारे, आणि प्रकाश महाजन (लाचलुचपत प्रतिबंधक), (सर्व पोलिस नाईक).
हेही वाचा: नागपूर : अपघातात पाय गमावूनही 'जिंकली' पदके
Web Title: Director General Medal Of Valor Announced To 22 Police Officers And Employees In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..