'त्‍या' शिष्यवृत्तीप्रकरणी खुलासा करा : शिक्षण उपसंचालक

Disclosure on Tribal Scholarship Deputy Director of Education Bhausaheb Chavan Nashik News
Disclosure on Tribal Scholarship Deputy Director of Education Bhausaheb Chavan Nashik Newsesakal

नाशिक : सुवर्णमहोत्‍सवी (Golden Jubilee) आदिवासी शिष्यवृत्ती निधीची मागणी न केल्‍याने विद्यार्थी लाभापासून वंचित राहिल्‍याचा दावा खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने केला होता. यासंदर्भात नाशिक महापालिकेच्‍या (NMC) प्रशासनाधिकाऱ्यांनी पुराव्‍यांसह तत्‍काळ खुलासा सादर करावा, अशा सूचना शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्‍हाण यांनी बुधवारी (ता. १३) केल्‍या आहेत. त्‍यामुळे महापालिका शिक्षण विभागाला (Department of Education) झटका बसला आहे.

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०१९-२०२० या कालावधीत सुवर्णमहोत्‍सवी आदिवासी शिष्यवृत्तीसाठी (Tribal Scholarships) तत्‍कालीन महापालिका प्रशासनाधिकाऱ्यांनी निधीची मागणी केली नसल्‍याचा दावा महासंघाने केला होता. या प्रकारामुळे वंचित विद्यार्थी या शिष्यवृत्तीरुरूपी मदतीपासून वंचित राहिले आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकावे लागण्याची वेळ आल्‍याचाही दावा महासंघातर्फे केला होता. यासंदर्भात थेट पुणे गाठताना शिक्षण संचालकांशी चर्चा झाली होती.

Disclosure on Tribal Scholarship Deputy Director of Education Bhausaheb Chavan Nashik News
Cricket Alert : नाशिकच्‍या तन्‍मयने टिपले 13 बळी

महासंघाचे मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, सचिव विकास थिटे यांच्‍यासह नाशिक जिल्‍हाध्यक्ष नंदलाल धांडे, सचिव सुनील बिरारी यांनी यासंदर्भात चर्चा करताना या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली होती. तसेच अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड सोसावा लागू नये, अशी मागणी केली होती. शिक्षण संचालकांनीही चौकशीसंदर्भात फेब्रुवारीत पत्र जारी केले होते. या पार्श्वभूमीवर शिक्षण उपसंचालक डॉ. चव्‍हाण यांनीही बुधवारी आदेश जारी करताना पुराव्‍यांसह खुलासा सादर करण्याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.

Disclosure on Tribal Scholarship Deputy Director of Education Bhausaheb Chavan Nashik News
आंतरराष्ट्रीय महिला गणित ऑलिंपियाडमध्ये सानिका बोराडेला कांस्यपदक

...अन्‍यथा होणार कारवाई
महापालिका प्रशासनाधिकारी यांच्‍या कार्यालयाकडून निधीची मागणी न केल्‍याने विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहिले आहेत किंवा कसे? असा प्रश्‍न परिपत्रकात उपस्‍थित केला आहे. याबाबत पत्र मिळाल्‍यानंतर तात्‍काळ उलटटपाली आवश्‍यक त्‍या पुराव्‍यासह खुलासा सादर करावा. खुलासा वेळेवर सादर न झाल्‍यास पुढील कार्यवाही प्रस्‍तावित केली जाईल, असे स्‍पष्ट करण्यात आले आहे.

Disclosure on Tribal Scholarship Deputy Director of Education Bhausaheb Chavan Nashik News
Ramzan Festival | 100 टन मैद्या फस्त; मागणीत दुपटीने वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com