लसीकरण केंद्रावर स्थानिक-बाहेरच्यांमध्ये वाद; पोलिस बंदोबस्ताची मागणी

लसीकरण(vaccination) केंद्रावर प्रथम गावातील नागरिकांना लस द्या आणि मग बाहेरच्यांना द्या, अशी भूमिका घेत असल्याची तक्रार आसपासच्या भागातील नागरिकांनी केली आहे.
Vaccination
VaccinationMedia Gallary

नाशिक : पिंपळगाव खांब येथे सुरू असलेल्या लसीकरण (vaccination) केंद्रावर स्थानिक ग्रामस्थ प्रथम गावातील नागरिकांना लस द्या आणि मग बाहेरच्यांना द्या, अशी भूमिका घेत असल्याची तक्रार आसपासच्या भागातील नागरिकांनी केली आहे. या ठिकाणी एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याची अथवा पोलिस(police) बंदोबस्ताची मागणी करून लसीकरण सुरळीत करण्याची मागणी केली आहे. (Disputes between local villagers and outsiders over vaccination)

स्थानिकांची, ''मेरी सुनो''!

दोन महिन्यांपासून हीच परिस्थिती असल्याचे पाथर्डी फाटा, इंदिरानगर, वासननगर आदी भागातील नागरिकांनी सांगितले. गावातील कुणीही येते आणि कधी स्थानिक आणि बाहेरची अशी लाइन लावा, तर आज फक्त गावातीलच लोकांना लस(vaccine) दिली जाईल. एखाद्या दिवशी गावातल्यांनी इतर ठिकाणाहून बोलविलेल्या नातेवाइकांना (relatives) प्राधान्य दिले जाईल, अशा सूचना करतात. विशेष म्हणजे ही मंडळी सांगतात, त्याच पद्धतीने येथील कर्मचारीदेखील कार्यवाही करतात. दररोज कोणीतरी स्थानिक येथे येतात, प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात आणि लसीकरणाचा घोळ घालत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

Vaccination
लस घेण्यासाठी नाशिकमध्ये पहाटे पाचपासून रांगा

टोकन नुसतं नावालाच

शुक्रवारी (ता. ७) येथे उपनगर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सकाळी रांग लागल्यानंतर टोकन वाटप करण्याची मागणी होत आहे. टोकन नेमके देतात तरी कधी, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ठराविक संख्या अथवा दिवस गावासाठी ठेवून ही व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक रोड-देवळाली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सोमनाथ बोराडे यांनीदेखील या ठिकाणी स्वतंत्र अधिकाऱ्याची अथवा यंत्रणेची नेमणूक करून या ठिकाणी लसीकरण सुरळीत करण्याची मागणी केली होती.

Vaccination
कश्मिरानं दिलं फुल्ल 'टशन'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com