esakal | कश्मिरानं दिलं फुल्ल 'टशन'
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmira shah

कश्मिरानं दिलं फुल्ल 'टशन'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेत्री कश्मिरा शहा (Kashmira Shah) ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिध्द आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कश्मिरानं तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. तिचे हॉट फोटो तिच्या चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी असते. काहीवेळी ती ट्रोलही झाली होती. आता कश्मिरानं (Kashmira Shah) इंस्टावर फोटो शेअर केला आहे. त्यावरुन तिला पुन्हा ट्रोल व्हावे लागले आहे.

सध्या तिचा रेड कलरचा बिकीनीतील फोटोही प्रसिध्द झाला आहे. ती पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय कश्मिरानं (Kashmira Shah) ब्ल्यु कलरचा सॅटिन शर्टही घातला आहे. तिचा तो बिनधास्त लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. तिनं तो फोटो शेअर करुन त्याला एक कॅप्शनही दिली आहे. माझ्याजवळ अनेक समीक्षक आहेत. ते काय म्हणतात याकडे मी फारसं लक्ष देत नाही. तितकासा वेळही माझ्याजवळ नाही. मी मला जे योग्य वाटते तेच करते. टीकाकार काय म्हणतात याला जास्त महत्व देण्याचे काही कारण नाही. मी स्वतच माझी चिअर लिडर आहे. जे कोणी ट्रोलिंग करत आहेत त्यांनी आता अधिक मेहनत करण्याची गरज आहे.

kashmira shah photos

kashmira shah photos

हेही वाचा: सुरुवातीला वडिल गेले, आठवड्याभरात मुलगाही...

हेही वाचा: भटक्या जीवांसाठी जॅकलीनची धडपड, सोशल मीडियावर पोस्ट शेअर

माझे जे हेटर्स आहेत त्यांनीही थोडीफार मेहनत घ्यावी असे मला वाटते. अंकिता लोखंडेनं कश्मिराच्या (Kashmira Shah) फोटोवर एक कमेंट केली आहे. तिनं लिहिलं आहे की, कश्मिरा ही खुप मोटीव्हेटिंग आहे. तुझ्यासारखं मलाही व्हायचं आहे. एका फॅननं लिहिलं आहे खुपच सुंदर कुणी एखादा गाढव असेल जो कोणी तुमचा व्देष करत असेल.