
ऐन परीक्षा काळात ‘बत्ती गुल’! मान्सूनपूर्व कामे ठरताहेत डोकेदुखी
इगतपुरी (जि. नाशिक) : कोरोना संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षण (Online Education) ते ऑनलाइन परिक्षा असा प्रवास आणि प्रवाह सुरु झाला आहे. सध्या परीक्षांचा हंगाम सुरु असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) तसेच इतरही विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन सुरू (Online Exams) आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. वर्ष वाया जाऊ नये म्हणून सर्वत्र आटापिटा सुरु असला तरी संकट मात्र थांबण्याचे नाव घेत नाहीत. (Dissatisfaction among students due to continuous power outage during Online exams)
विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षांमध्ये महावितरणमुळे अनेक अडचणी येत आहेत. पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे धोकादायक असलेली कामे करण्यात येत आहेत. वाढलेल्या झाडांच्या तोडण्यासाठी साधारण चार-सहा तास वीजपुरवठा बंद करण्यात येतो. कोरोना परिस्थितीमुळे सर्वच परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे सर्व परीक्षा घरून द्याव्या लागत आहेत. ऐन परीक्षेच्या वेळेसच महावितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची पुरती दमछाक होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करण्यात येत असल्याने वेळेवर विद्यार्थ्यांची फजिती होत आहे. परिणामी वेळेवर वीजपुरवठा सुरू असलेल्या ठिकाणी मित्रमंडळी यांचा सहारा घेऊन परीक्षा द्यावी लागते.
हेही वाचा: कठोर निर्बंधांची जिल्ह्यात आजपासून अंमलबजावणी
याबरोबरच मोबाईल कंपन्यांचे बरेचसे टॉवर विजेचीच जोडलेले आहेत. काहींना पॉवर बँकअप नसल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास कनेक्टिव्हिटीदेखील जात असल्याने बऱ्याच अडचणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे. पावसाचे वातावरण निर्माण झाल्यास हानी टाळण्याच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात येतो. वीज कंपनीने दीर्घकाळ वीजपुरवठा सुरळीत राही, अशा प्रकारची कामे तत्काळ करावी असा सूर उमटत आहे.
हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमाची ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. विजेच्या लपंडावाने परीक्षा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. महावितरण विभागाने कोणत्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार आहे, याची पूर्वकल्पना दिल्यास वणवण थांबेल.
- कल्पना गव्हाणे,परीक्षार्थी विद्यार्थिनी.
(Dissatisfaction among students due to continuous power outage during Online exams)
Web Title: Dissatisfaction Among Students Due To Continuous Power Outage During Online
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..