नाशिक: जिल्हा बँकेच्या संपूर्ण व्याजमाफीसंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण बैठक घेणार असल्याचे आश्वासन अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले. दिंडोरी येथील वणारे येथील निवासस्थानी शेतकरी समन्वय समितीचे राज्य अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, बाळासाहेब बोरस्ते, रमेश बोरस्ते, मोतीनाना पाटील, सुनील नाठे, सुनील बोरस्ते, रामदास सोनवणे यांच्यासह शेतकरी प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली.