नाशिक- नोटाबंदीच्या काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडे शिल्लक राहिलेल्या कोट्यवधींच्या नोटा जमा करण्यासाठी नाशिकसह नागपूर व वर्धा येथील जिल्हा बॅंका राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करणार आहेत. बँकेचा खर्च अजून कमी करून कर्जवसुलीसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थांविरोधात आक्रमक पवित्रा अवलंबण्याचा निर्णय सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला.