District Bank
sakal
नाशिक: शेतकऱ्यांची अर्थवाहिनी ठरलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे लायसन्स वाचविण्यासाठी राज्य शासनाकडून मिळणारी ६७२ कोटींची रक्कम मुदत ठेवींमध्ये गुंतविण्यात येणार असल्याचे समजते. त्याच्या व्याजातून बँकेला आपले खर्च भागविता येतील. टप्प्याटप्प्याने बॅंक सुस्थितीत येण्यासाठी पुढील उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सहकार तज्ज्ञांनी म्हटले आहे.