Ayush Prasad
sakal
नाशिक: जिल्हा पुरवठा विभागाने सामाजिक बांधिलकीतून ज्येष्ठ आणि दिव्यांग बांधवांना घरपोच धान्य वितरणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (ता. ७) जिल्ह्यातील ५९४ दिव्यांग आणि ६४३ ज्येष्ठ नागरिक अशा एक हजार २३७ कुटुंबांपर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे धान्य वितरित करण्यात आले.