नाशिक- अवैधपणे गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात जिल्हा गौणखनिज विभागाने मोहीम उघडली आहे. चालू आर्थिक वर्षात जूनअखेर ४० वाहनांवर कारवाई करताना ६२ लाख २३ हजार २६० रुपयांचा दंड बजावण्यात आला. तसेच, १४ वाहने प्रशासनाने जप्त केली आहेत. .एप्रिलच्या अखेरीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिक विभागाचा महसूल आढावा घेतला होता. त्या बैठकीत अवैध गौणखनिज प्रकरणी कारवाया वाढवाव्यात, असे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले होते. त्यानुसार यंत्रणा आता ‘ॲक्शन मोड’वर आल्याचे पाहायला मिळते. महसूल प्रशासन व गौणखनिज विभागातर्फे गौणखनिजाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच, अशा वाहनांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे..जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत वाळू, दगड, मुरूम यांसारख्या गौणखनिजाची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या ४० वाहनांवर कारवाई करण्यात आली. या वेळी संबंधित वाहनधारकांना ६२ लाख २३ हजार २६० रुपयांचा दंड केला गेला. त्यापैकी ३८ लाख ४७ हजार ६४० रुपयांची वसुली प्रशासनाने केली आहे. अद्यापही दंडाची २३ लाख ७५ हजार ६२० रक्कम वसूल करणे बाकी असल्याचे प्रशासनाच्या माहितीतून समोर आले..Athani Road Accident : शाळेला जाणाऱ्या दहा वर्षांच्या मुलाला कारने उडविले; अगश्य जागीच ठार, घटनास्थळी कुटुंबीयांचा आक्रोश.येवल्यात सर्वाधिक दंडमहसूल प्रशासनाने येवल्यात चार वाहनांवर कारवाई करताना सर्वाधिक १२ लाख ४५ हजार ४०५ रुपयांचा दंड ठोठावला आहे; तर बागलाणला ११ वाहनांवरील कारवाईत तीन लाख ९६ हजार ६५८ रुपयांचा दंड केला. नाशिक तालुक्यात तीन वाहनांना सहा लाख ९७ हजार ७२५ रुपयांचा दंड करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर, पेठ व नांदगाव या तीन तालुक्यांत अद्याप एकही कारवाई झालेली नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.