Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजनेची खाते उघडण्याची विशेष मोहीम!

Sukanya Samriddhi Yojana
Sukanya Samriddhi Yojanaesakal

सिन्नर (जि. नाशिक) : दिल्ली येथील प्रगती मैदानावर येत्या ११ ते १५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अमृतपेक्स-२०२३ या राष्ट्रीय टपाल तिकीट प्रदर्शनाच्या (फिलाटेली) औचित्याने नाशिक विभागात सुकन्या समृध्दी योजनेचे खाते उघडण्याची विशेष मोहिम भारतीय डाक (Postal) विभागाच्या नाशिक विभागाने हाती घेतली आहे. (Division of Indian Postal Department has undertaken special drive to open accounts of Sukanya Samriddhi Yojana nashik news)

येत्या ९ आणि १० फेब्रुवारीला विशेष मोहीमेतंर्गत नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुकन्या समृध्दी योजनेची खाती उघडण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिराव यांनी दिली.

सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ १० वर्षाच्या आतील वयोगटाच्या मुलींसाठी घेता येईल. सुरवातीला फक्त २५० रुपये भरून खाते सुरू करता येऊ शकते. सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत ७.६ टक्के असा आकर्षक व्याजदर भारतीय टपाल विभागामार्फत दिला जात आहे.

दरवर्षी आर्थिक वर्षात कमीत कमी २५० रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये या खात्यावर जमा करता येऊ शकतात. खात्यावर जमा केलेल्या रकमेवर आयकरात ८०-सी अंतर्गत सुटही मिळते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Sukanya Samriddhi Yojana
Nashik News: नांदगावच्या शिवसृष्टीला मिळाली चालना; शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी वास्तू उभारणीच्या कामाला प्रारंभ!

"केंद्र शासनाच्या या योजनेचा ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत लाभ मिळावा यासाठी प्रत्येक डाक विभागाचा कर्मचारी कार्यरत आहे. आवश्यक कागदपत्रे जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये जमा करुन केवळ २५० रुपयात सुकन्या समृध्दी खाते उघडता येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा." -मोहन अहिराव, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक

"सुकन्या समृध्दी योजनेविषयी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, मजूर यांना माहिती मिळावी आणि मुलीच्या भविष्यासाठी बचत व्हावी यासाठी गावोगावी मेळावा घेऊन डाक विभागामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. महिला सबलीकरणासाठी आणि मुलीच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी ही योजना चांगली आहे. केंद्र शासनाने सुरु केलेल्या या योजनेत ग्रामीण डाक सेवक जनजागृती करीत आहेत."-विशाल निकम, सहाय्यक डाक अधीक्षक, पश्चिम उपविभाग

Sukanya Samriddhi Yojana
Online Fraud News : ऑनलाइन 56 हजार 310 रुपयांची रोकड लांबविली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com