Latest Marathi News | गार्गी महाविद्यालयाच्या दिव्या कर्डेलला Khelo India स्पर्धेत सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Divya Kardel won gold medal

गार्गी महाविद्यालयाच्या दिव्या कर्डेलला Khelo India स्पर्धेत सुवर्णपदक

नाशिक : येथील गार्गी अग्रीकॅल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मधील दिव्या कर्डेल हिला खेलो इंडिया अंतर्गत महिलांच्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले. हि स्पर्धा गुजरात मधील मेहेसाना येथील सरदार पटेल कॉम्प्लेक्स मध्ये ११ ते १५ सप्टेंबर २०२२ दरम्यान संपन्न झाली. देशातील पहिल्या १६ खेळाडू मधेही तिची निवड झाली आहे. (Divya Kardel of Gargi College won gold medal in Khelo India competition Nashik Latest Marathi News)

दिव्या कर्डेल हि गार्गी महाविद्यालयात M.Sc. I वाईन,बृइंग आणि अल्कोहोल टेक्नोलॉजी या वर्गात शिकत असून आतापर्यंत अनेक स्पर्धामध्ये तिने यश मिळविले आहे. या तिच्या यशाबद्दल गार्ती संस्थेचे अध्यक्ष राजन बच्छाव, उपाध्यक्ष विजय बच्छाव, सचिव सुरेखा बच्छाव, प्राचार्य डॉ.एम.पी.शिंदे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक सोनम बच्छाव तसेच राष्ट्रेश बच्छाव यांचेसह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.