Latest Marathi News | बाजारपेठेत दिवाळी Feverकायम; खरेदीसाठी महिलांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Market Crowd After Diwali For Shopping

Nashik : बाजारपेठेत दिवाळी Feverकायम; खरेदीसाठी महिलांची गर्दी

जुने नाशिक : बाजारपेठेत दिवाळी फिवर अजूनही कायम आहे. भाऊबीजनिमित्त माहेरी आलेल्या माहेरवासींनीकडून होत असलेल्या खरेदीने बाजारपेठ गजबजली आहे.दिवाळी सणानिमित्त गेल्या १५ दिवसांपासून मेन रोड शालिमार बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सतत बाजारपेठेत जनसागर उमळल्याचे दिसून आले.

दिवाळीनंतर गर्दी कमी होईल, असे वाटत होते. मात्र, गर्दी काही कमी झालेली नाही. आजही बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. भाऊबीजनिमित्त माहेरवासीनी माहेरी आल्या आहेत. दिवाळीची भेट म्हणून माहेरची मंडळी व भाऊबीजेची भेट म्हणून भाऊरायाकडून बहिणीस आवडेल ती भेट घेऊन दिली जात आहे.(Diwali Excitement Continue in Market Women Crowd Shopping Nashik News)

हेही वाचा: Nashik : सातपूर, अंबडला छटपूजा उत्साहात

तिच्या मुलांनाही कपडे व अन्य काही वस्तू खरेदी करून दिल्या जात आहेत. इतकेच नाही, तर माहेरवासीनी बहिणीही स्वतःसह कुटुंबीयांसाठी खरेदीसाठी बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे बाजारपेठ माहेरवासींनीच्या गर्दीने फुलली आहे. सौंदर्य प्रसाधनेपासून ते दागिन्यांपर्यंत अशा अनेकप्रकारची खरेदी त्यांच्याकडून केली जात आहे.

विशेष करून कपड्यांच्या दुकानांमध्ये अधिक गर्दी बघावयास मिळत आहे. गेली दोन वर्ष कोरोना प्रादूर्भावामुळे बहिणींना भाऊबीज साजरी करता आली नाही. साध्या पद्धतीने घरातल्या घरात सण साजरे झाले होते. यंदा मात्र परिस्थिती सामान्य असल्याने प्रत्येक सण उत्साहात साजरा झाला. त्यामुळे दोन वर्षे हिरावलेला आनंद या वर्षी व्यक्त करण्यात आला. चिमुकल्यांही यंदा मामाच्या गावी येता आले. त्यामुळे त्यांचा दोन वर्षांनंतरचा पाहुणचार त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच असावा, यासाठी माहेरीलकडील मंडळी झटत असल्याचे बाजारपेठेच्या गर्दीतून बघायलाच मिळाले.

हेही वाचा: Nashik : प्रवाशांनी गजबजली बसस्‍थानके