Diwali Padwa 2022 : दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक!

Diwali Festival 2022
Diwali Festival 2022esakal

पल्लवी कुलकर्णी-शुक्ल : सकाळ वृत्‍तसेवा

नाशिक : बलिप्रतिपदा...दिवाळी पाडवा, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. सुवर्ण खरेदीसाठी सर्वोत्तम मुहूर्त मानला जातो. तसेच सुवासिनींकडून पतीला औक्षण व व्यापारासाठी शुभारंभ याही दृष्टीने पाडव्याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक शुक्‍ल प्रतिपदेस विक्रम संवत्‍सर सुरू होते. कृषिप्रधान संस्‍कृती व पौराणिक महत्त्व त्यास असून कार्तिकमध्ये पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला साजरा करण्यात येतो. आरंभदिन म्‍हणून बलिप्रतिपदा अथवा पाडवा महत्त्वाचा मानला गेला आहे. तसेच मुहूर्तावर नव्याने सुरवात केली जाते. (Diwali Padwa 2022 Diwali Padwa is one of three half muhurat Nashik Latest Marathi News)

पाडवा प्रेम वृद्धींगत व्हावे म्‍हणून पत्‍नी ही पतीस आणि मुली आपल्‍या वडिलांना औक्षण करतात. पाडव्याला वडील व पतीस तेल उटणे लावून अभ्‍यंगस्‍नान घातले जाते. वैवाहिक संसार उज्‍वल व्हावा आणि पती–पत्‍नीतील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सतत वाढत राहो, यासाठी पत्नी ही पतीचे औक्षण करते. पती हा पत्नीला ओवाळणी म्‍हणून साडी, सोन्याची वस्‍तू भेट देतो.

साडेतीन मुहूर्तापैकी पाडवा पूर्ण शुद्ध मुहूर्त असल्याने शुभ कामाची सुरवात करण्यासाठी पूर्ण दिवस शुभ मानला जातो. शिवाय कामधेनू म्‍हणून सतत वृध्दीचे प्रतीक असलेली गाय व गोवर्धन पूजा केली जाते. शेणाचा पर्वत करून त्‍याला दुर्वा-फुले वाहतात. श्रीकृष्‍ण, इंद्र, गायी व वासरे यांच्या चित्राची पूजा केली जाते. तसेच मिरवणूकही काढली जाते. उत्‍तर भारतात विष्‍णूची पूजा करून पंचपक्‍वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो.

Diwali Festival 2022
Diwali Festival 2022 : गोवत्सपूजनाने प्रकाशोत्सवाची हर्षोल्हासात सुरवात

पाडवा समृद्धीचे प्रतीक म्‍हणून अन्नकुट असेही म्‍हणतात. व्यापारी वर्ग या दिवशी आर्थिक वर्षाची सुरवात करतात. जमा-खर्चासाठी नवीन शुभ रंग मानला जाणाऱ्या लाल वह्या अथवा खतावणी वापरासाठी सुरवात केली जाते. नवीन वह्यांची म्‍हणजेच खतावणींची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करतात.

दानशूरता अन क्षमाशीलतेचे पूजन

बळीराजाच्या दानशूरतेची व क्षमाशीलतेची पूजा केली जाते. इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्‍य येवो, अशी प्रार्थना केली जाते. पाडव्याला जमिनीवर सप्तरंग रांगोळीने अथवा शेणाने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. त्यानंतर दीप व वस्त्रदान केले जाते. ही आख्यायिका एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत दीपोत्सवाच्यानिमित्ताने पोचते.

Diwali Festival 2022
Diwali 2022 : आनंद द्विगुणित करण्यासाठी घ्या खबरदारी; MSEDCLचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com