Diwali Ration Sheme : आनंदाचा शिधापासून 40 हजार कार्डधारक वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

State Govt Diwali Ration

Diwali Ration Sheme : आनंदाचा शिधापासून 40 हजार कार्डधारक वंचित

नाशिक : दिवाळी सणाच्‍या तोंडावर आनंदाचा शिधा ऑफलाइन पद्धतीने वितरित करण्याचे आदेश राज्‍य शासनाने दिले. मात्र या निर्णयामुळे पोर्टेब्‍लिटी केलेल्‍या जिल्ह्यातील सुमारे चाळीस हजार रेशनकार्डधारकांना शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे अशा कार्डधारकांमध्ये नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे. (Diwali Ration Scheme 40 thousand card holders deprived of Diwali Ananda ration scheme nashik news)

'वन नेशन वन रेशन’ या राष्ट्रीय स्‍तरावरील मोहिमेअंतर्गत एका जिल्ह्यातील लाभार्थ्यांना अन्‍य ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने रेशन घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. योजनेत सहभागासाठी नजीकच्‍या दुकानाला भेट देत रेशनकार्ड पोर्टेब्‍लिटी करून घ्यावयाची असते. मोहिमेत खानदेश आणि मराठवाड्यासह अन्‍य विविध ठिकाणांहून नाशिकला स्थलांतरित झालेले सुमारे चाळीस हजार रेशनकार्डधारक कुटुंबीय ऑनलाइन पद्धतीने दर महिन्‍याला रेशन प्राप्त करून घेतात.

परंतु राज्‍य शासनाच्‍या निर्णयामुळे पोर्टेब्लिटी केलेल्या कार्डधारकांना दिवाळीसाठी शंभर रुपयांमध्ये उपलब्ध केलेल्‍या आनंदाचा शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे.
गेल्‍या आठवड्याभरापासून जिल्‍ह्‍यात आनंदाचा शिध्याचे किट वितरित केले जात आहेत. परंतु ऑनलाइन पद्‍धतीने वितरणात तांत्रिक अडचणी उद्भवत असल्‍याने ऑफलाईन पद्धतीने किट वाटपाच्‍या सूचना तीन दिवसांपूर्वी शासनाने दिल्‍या होत्‍या.

हेही वाचा: Nashik Crime News: नकली पिस्तूल दाखवत लुटण्याचा प्रयत्न; समयसूचकतेमुळे भामटा गजाआड

ऑफलाइन पद्धतीने वितरण करताना लाभार्थ्यांना त्यांच्या मुळ दुकानातून शिधा घेणे बंधनकारक केलेले आहे. त्यामुळे पोर्टेब्‍लिटी केलेल्या चाळीस हजार रेशनकार्डधारकांना त्‍यांच्‍या मूळगावी किट उपलब्‍ध होऊ शकणार आहे.

अर्धवट किटचे वाटप

सुरळीत पद्धतीने आनंदाचा शिधा वितरित केला जात असल्‍याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जाते आहे. परंतु प्रत्‍यक्षात मात्र स्‍वस्‍तधान्‍य दुकानांसमोर किट खरेदीसाठी विविध तालुक्‍यांमध्ये गर्दी होताना दिसून येत आहे. काही भागातील दुकानांमध्ये तीनच वस्‍तू उपलब्‍ध झालेल्‍या असल्‍याने लाभार्थ्यांना अर्धवट किटचे वितरण करावे लागत आहे.

हेही वाचा: नाशिक: महाराष्ट्राच्या सुपुत्राला सीमेवर वीरमरण; दिवाळीत गावावर शोककळा