dogs in the area disappeared
dogs in the area disappeared

दिवसेंदिवस वस्तीवर कुत्रे झाले दिसेनासे; कारण समजताच ग्रामस्थांचा उडाला थरकाप

Published on

नाशिक/ सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात उजनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून   गोसावी बाबा मंदिर परिसरातील अनेक वस्त्यांवरील कुत्री बेपत्ता होत असल्याने शेतकरी चिंतित झाले होते. त्यांना जेव्हा अचानक कुत्री गायब होण्यामागील कारण समजले तेव्हा मात्र त्यांचा थरकाप उडाला, नेमके काय घडले वाचा..

मागच्या काही दिवसात परिसरातील 12 ते 15 कुत्री अचानक बेपत्ता झाली.  त्यानंतर सुरसे वस्ती येथे राम सुरसे यांच्या चंदन बागेच्या परिसरात पाणी भरलेल्या शेतात त्यांनी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. सुरसे यांनी सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांना मोबाईलवर या पावलांचे ठसे पाठवले. हे ठसे बिबट्याच्या पावलांचे असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट करत परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले होते.

शेतमजुराला प्रत्यक्ष दर्शन 

आज (दि. 23)  सकाळी सात वाजेच्या सुमारास परिसरातील एका शेतमजुराला मारलेल्या कुत्र्यावर ताव मारणारा बिबट्या आढळून आला. शेतमजुराची चाहूल लागल्याने बिबट्याने आपली शिकार ऊसाच्या शेतात ओढून नेली. हा प्रकार समजल्यावर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आज सकाळी एका शेतमजुराला बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने घबराट पसरली आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा असे पत्र वनविभागास दिले आहे.

.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com