Nashik Crime News : लखमापूरला भरदिवसा मंदीराची दानपेटी फोडली

temples donation box
temples donation boxesakal

Nashik Crime News : लखमापुर, ता. दिंडोरी येथील श्री खंडेराव मंदिर व श्री वाघेश्वरी माता मंदिरातील दोन दानपेट्या गुरुवार, ता. २७ रोजी भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजीत पंचवीस हजार रुपयांची दानपेटीतील रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत वणी पोलिसांत अज्ञात चोरट्यां विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Donation box of temple broken robbed in daylight in Lakhmapur Nashik Crime News)

लखमापुर र येथील ग्रामदेवता वाघेश्वरी माता मंदिर व कुलदैवत खंडेराव महाराज मंदिरातील गुरुवारी, ता. २७ रोजी खंडेराव महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष वाल्मिक मोगल हे सकाळी ८ वाजेचे सुमारास व इतर ग्रामस्थ भाविक नेहमी प्रमाणे खंडेराव मंदिरात देवदर्शनासाठी येवुन दर्शन घेवुन नेहमी प्रमाणे सकाळी 10:00 वाजेचे सुमारास मंदीराचे गेटला कुलुप निघुन गेले होते.

सायंकाळी ४ वाजेचे सुमारास वाल्मिक मोगल हे श्रावण मोगल, अशोक मेसट असे खंडेराव मंदीरात नेहमी प्रमाणे देवदर्शनासाठी मंदीराचे हॉलचा दरवाजा उघडुन आत गेलो असता, त्यांना मंदीरात ठेवलेली दान पेटीचे जवळ सुटटे पैसे खाली पडलेले दिसले व दान पेटीचे कुलुप तुटलेले दिसले.

तसेच मुर्तीचे समोर ठेवलेला त्रिशुल दान पेटी जवळ मोडलेल्या अवस्थेत दिसला म्हणुन त्यांनी लगेच वाघेश्वरी देवीचे मंदीरात गेले, तिथेही ठेवलेली दान पेटी जवळ त्रिशुलाचा दांडा पडलेला दिसला व दान पेटीचे कुलूप तोडलेले दिसले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

temples donation box
Jalgaon Crime News : महिलेवर अत्याचारप्रकरणी 10 वर्षे शिक्षा

यावेळी मंदीरातची पाहणी केली असता, त्यावेळी मंदीराचा उत्तर दरवाजाची कडी ताणुन दरवाजा उघडलेला दिसल्याने मंदीरात दानपेटीची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे मंदिरातील त्रिशुळांच्या साह्याने दोन्ही दानपेट्याच्या कड्या तोडण्यात आल्या आहेत.

दोन्ही मंदिरातील दानपेट्या या फक्त वार्षिक यात्रेच्या दिवशी उघडण्यात येत असल्याने या दानपेट्यामध्ये अंदाजीत पंचवीस हजारो रूपयांची अज्ञात चोरट्यांनी ही चोरी केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत वणी पोलिसांत ट्रस्टचे अध्यक्ष वाल्मिक मोगल यांनी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी मंदिर व परीसरात सुरक्षतेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे.

temples donation box
Dhule Crime News : धुळ्यातून अल्पवयीन मुलींचे अपहरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com