Nashik Crime News : कालभैरवनाथ महाराज मंदिरातून दानपेटी चोरीस

CCTV footage
CCTV footageesakal

सिन्नर (जि. नाशिक) : शहा (ता. सिन्नर) येथील ग्रामदैवत कालभैरवनाथ महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना मकरसंक्रांतीच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. या मंदिरात अनेक ठिकाणचे भाविक येत असतात. त्यामुळे येथे सतत भाविकांची मांदियाळी सुरू असते. त्यामुळे दानपेटीत अंदाजे ५० ते ६० हजारांची रक्कम असावी, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. (Donation box stolen from Kalbhairavanath Maharaj temple Nashik Crime News )

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

CCTV footage
Nashik Crime News : सातपूरमध्ये 30 वर्षीय तरुणाचा खून

याठिकाणी लोकवर्गणीतून सुमारे एक कोटी रूपये खर्चून २००७मध्ये ग्रामस्थांनी मंदिराचे बांधकाम केले. दरवर्षी कालभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. दर रविवारी कालभैरवनाथ महाराज मंदिरात दर्शन करुन स्वामी समर्थ केंद्राच्या भाविकांची बैठक होत असते.

शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात व दानपेटीत आपापल्या परिने दानही टाकतात. वर्षभरात चारवेळा ही दानपेटी खोलून जमा रकमेतून देवस्थानसंबंधी आवश्यक खर्च भागवला जातो.

तथापि, चोरट्यांनी मकरसंक्रांतीच्या मध्यरात्री दानपेटी चोरुन नेली. ग्रामस्थांनी वावी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.

चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

दरम्यान, चोरट्यांच्या सगळ्या हालचाली मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. चोरट्यांनी दानपेटीच उचलून नेल्याचे त्यात दिसत आहे. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे.

"ग्रामदैवत कालभैरवनाथ महाराज हे जागृत देवस्थान आहे. भाविक येथे श्रद्धेने लीन होत असतात. पोलिसांनी या चोरीचा कसून तपास करुन अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याची गरज आहे." - संभाजी जाधव, सरपंच

CCTV footage
Pune Crime News : वारजे माळवाडीतील आणखी एका टोळीवर मोका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com