Crime
sakal
मालेगाव: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचारवर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून तिचा खून करण्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. भावनांचा उद्रेक झाल्याने ग्रामस्थांनी सोमवारी (ता. १७) मालेगाव- कुसुंबा महामार्ग रोखून धरला. संशयित आरोपी नराधमाला अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.