धुळे- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी (ता. १४) साजरी होत आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वेळेस धुळे जिल्ह्याचा केलेला दौरा ऐतिहासिक ठरला. .त्यांच्या पदस्पर्शाने धुळे आणि त्यांच्या स्मृतीही पावन झाल्या आहेत. दौऱ्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी भेटी दिलेल्या संस्थांमधील पुस्तिकेतील त्यांच्या हस्ताक्षरातील अभिप्राय अनमोल ठेवाच ठरला आहे. यासंबंधी त्यांच्या स्मृती, आठवणी जयंतीनिमित्त पुन्हा ताज्या झाल्या..डॉ. आंबेडकर त्यांच्या ६५ वर्षांच्या आयुष्यात धुळ्यात दोन वेळा आले. डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीतील सुवर्णपान धुळ्यासह खानदेशच्या नावेही कोरले गेले आहे. डॉ. आंबेडकर यांची येथील ऐतिहासिक स्मृती आज ८८ वर्षांनंतरही तितकीच ताजी आणि प्रेरणादायी ठरते आहे. याचा जुनी पिढी जसा अभिमान बाळगते, तसा तो नव्या पिढीतही रूजत आहे. धुळे दौऱ्यातील डॉ. आंबेडकरांच्या ऐतिहासिक स्मृती केवळ आंबेडकरी अनुयायीच नव्हे तर परिवर्तनवादी वाटेवरच्या प्रत्येकासाठी गौरवशाली, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहेत..डॉ. आंबेडकर यांचा धुळे दौरा का?धुळे जिल्हा न्यायालयातील तत्कालीन नामवंत वकील ॲड. प्रेमसिंग आनंदसिंग तवर यांनी डॉ. आंबेडकरांना एका दाव्याच्या युक्तिवादासाठी धुळ्यास येण्याचे आग्रही निमंत्रण दिले. त्यानुसार डॉ. आंबेडकर दौऱ्यावर होते. वाघाडी (ता. शिरपूर) येथील हुलेसिंग मोतीराम जहागीरदार-पाटील आणि मगन मथुरादास वाणी व इतर १६ जण यांच्यात पोळ्याच्या मुद्द्यावरून वाद झाला होता. यात जहागीरदारांनी पोळा मिरवणुकीत आपले बैल पुढे ठेवण्यासाठी अर्ज केला होता. तत्कालिन प्रांताधिकाऱ्यांनी जहागीरदार यांच्या विरोधात निर्णय दिला. त्यावर जहागीरदार अपिल अर्ज केला होता. या सुनावणीसाठी जहागीरदार यांचे वकील प्रेमसिंह तंवर यांनी डॉ. आंबेडकर यांना निमंत्रित केले होते. बाबासाहेबांच्या युक्तीवादामुळे निकाल जहागिरदार यांना अनुकुल असा लागला..ऐतिहासिक लांडोर बंगल्यास भेटलळिंग (ता. धुळे) येथील डॉ. आंबेडकरांचे अनुयायी पी. एल. लळिंगकर यांनी आपल्या लळिंग गावास भेट द्यावी, असा आग्रह आंबेडकरांकडे धरला. त्यानुसार ॲड. तवर आणि लळिंगकर यांच्या आग्रहाखातर लळिंगला भेट देता येईल, असा विचार डॉ. आंबेडकरांनी केला आणि तसे पत्र त्यांनी ॲड. प्रेमसिंग तवर यांना पाठविल्याची स्मृती त्यांचे नातू व विद्यमान धुळे जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह योगेंद्रसिंह तवर यांनी आज पुन्हा ताजी केली..याशिवाय डॉ. आंबेडकरांना धुळ्यातील नामांकित धर्मतत्त्वचिंतक महामहोपाध्याय श्रीधर शास्त्री पाठक यांच्या ‘अस्पृश्यतेला शास्त्राधार नाही’ या ग्रंथासंबंधी व श्रीधर शास्त्रींच्या प्रतिपालनाविषयी अधिक स्पष्टीकरण हवे होते. तसेच धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या कार्याविषयीही जिज्ञासा, राजेंद्र छात्रालयाविषयी माहिती जाणणे, दलित समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांविषयी आस्था असल्याने डॉ. आंबेडकरांनी धुळे भेटीचा निर्णय घेतला..दर्शनासाठी जनसमुदाय अन् भाषणडॉ. आंबेडकर यांच्या निर्देशांनुसार ॲड. तवर यांनी त्यांच्या तीन दिवसीय मुक्कामाची व्यवस्था लळिंग (ता. धुळे) येथील वन विभागाच्या निसर्गरम्य लांडोर बंगल्यात केली होती. तेथे मोठा जनसमुदाय डॉ. आंबेडकरांच्या दर्शनासाठी एकत्रित झाला होता. या समुदायापुढे डॉ. आंबेडकरांनी पंधरा मिनिटे भाषण दिले. ते म्हणाले होते, ‘‘आया, बहिणींनो, समाजबांधवांनो, तुमची कितीही हलाखीची स्थिती असली तरी गरिबीच्या नरकातून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाची कास धरा. मुलाबाळांना शाळेत पाठवा. झाडपाला, चारा विका, अथवा मोळ्या विका. पण आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवायचे विसरू नका. कारण शिक्षणाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही.’’.संस्थांना भेटी आणि हस्ताक्षराचे जतनडॉ. आंबेडकरांनी राजेंद्र छात्रालयाचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब विनायक नरहर बर्वे यांच्या आग्रहाखातर धुळ्यातील नेहरू चौक परिसरातील राजेंद्र छात्रालयास ३१ जुलै १९३७ ला भेट दिली होती. नंतर १७ जून १९३८ ला बाबासाहेब धुळ्यात आले होते. १९ जूनपर्यंत ते येथे असल्याचे सांगितले जाते. त्यातील १८ जूनला त्यांनी येथील राजवाडे संशोधन मंडळाला दिलेल्या भेटीची नोंदही आढळून येते. त्यातील अभिमान डॉ. आंबेडकरांचे हस्ताक्षर पाहून आजही फुलतो. .३१ जुलै १९३७ ला राजेंद्र छात्रालय व १८ जून १९३८ ला राजवाडे संशोधन मंडळाला दिलेल्या भेटीदरम्यान डॉ. आंबेडकरांनी भेट पुस्तिकेत लिहिलेले संदेश आजही पाहता येतात. हा ऐतिहासिक दस्तऐवज या दोन्ही संस्थांनी जतन करून ठेवला आहे. ३१ जुलैच्या अविस्मरणीय आठवणीतून लळिंग किल्ल्यावरील लांडोर बंगल्यातील डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य हे आता खऱ्या अर्थाने स्मृतिस्थळ बनले आहे. दर वर्षी ३१ जुलैला येथे ‘भीमस्मृती यात्रा’ भरत असते..धुळ्यातील मार्गदर्शनाची एक आठवणडॉ. आंबेडकरांनी १७ जून १९३८ ला मनोहर थिएटरजवळील म्युनिसिपल शाळा क्रमांक पाचच्या आवारात आपल्या समाजबांधवांसमोर भाषण केले. स्वतंत्र मजूर पक्षाच्या वाटचालीसह आपल्या राहणीमानाचा दर्जा उंचवा, स्वाभिमानाने जीवन जगा, मुलांना शिकवा अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केल्याचे काही पुस्तकातील नोंदीतून समजते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.