डॉक्टर आणि वकील हे दोन व्यवसाय असे आहेत; ज्यांची आठवण सर्वसामान्यांना कायम अडचणीच्या वेळेलाच होते. कायदेशीर न्याय मिळविणे असो किंवा वैद्यकीय सेवा, सामान्य लोक कायम शेवटचा उपाय म्हणून या व्यावसायिकांकडे वळतात. या क्षेत्रात काम करीत असताना कर्तव्याची जाणीव असणारे डॉक्टर वडील आणि वकील आई असलेल्या कुटुंबात डॉ. अमित कराड यांचा जन्म झाला.