Breaking News : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविल्याने तणाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agitation

Breaking News : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविल्याने तणाव

नाशिक रोड : जय भवानी रोड परिसरात अनधिकृतरित्या बसविण्यात आलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा मनपाने हटविल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेमुळे मोठ्याप्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (Breaking News Tension over removal of Babasaheb Ambedkar statue at jai bahvani road nashik road nashik news)

हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Nashik Crime News : गुटखा विक्री अन् वाहतुकीत अल्पवयीन मुलांचा सहभाग

शहरातील जय भवानी रोड परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला होता. यासंबंधी 7 डिसेंबर 2022 रोजी उपनगर पोलिस ठाण्यात बेकायदेशीर पुतळा बसविल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. मनपा प्रशासनाने अनधिकृतपणे बसविलेला हा पुतळा पोलिस बंदोबस्तात हटवला.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा पुतळा काढल्याचा निषेधार्थ सर्व समाज बांधवांना एकत्र जमविण्याचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा जय भवानी रोड येथे दाखल झाला आहे.

हेही वाचा: Braking News : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविल्याने तणाव; पाहा PHOTOS

"अनधिकृत पुतळे काढण्यासंदर्भात शासनाचे जे काही नियम आहेत त्याप्रमाणे कारवाई केली आहे .शासनाच्या सर्व नियमांच्या अनुषंगाने ही कारवाई झालेली आहे. करण्यास हरकत नाही. कायद्याच्या, नियमांच्या चौकटीत राहून तसेच जिल्हाधिकारी यांची रीतसर परवानगी असेल तर पुतळा बसविण्यास हरकत नाही." - विजय मुंढे, महापालिका उपायुक्त

"आम्ही सहा डिसेंबरला पुतळा उभारला होता. काल रात्री दीड वाजेच्या सुमारास महापालिका प्रशासन व पोलिसांनी पुतळा काढून घेतला. या संदर्भात आवाज उठवणाऱ्या भीमसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे मोबाईल जप्त केले. पुतळा जोपर्यंत पुन्हा बसवत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार आहोत." - संजय भालेराव

हेही वाचा: Border Dispute : मंत्री गेले नाहीत पण रोहित पवार…; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना डिवचलं