Dr. Bharati Pawar News: शौचालयामुळे कोट्यवधी महिला सुरक्षित : डॉ. भारती पवार

कळवणला ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानांतर्गत अमृतकलश यात्रा
Union Minister of State for Health Dr. Other officials next to Bharti Pawar
Union Minister of State for Health Dr. Other officials next to Bharti Pawaresakal

Dr. Bharati Pawar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाची सुरवातीला विरोधकांसह अनेकांनी खिल्ली उडविली. मात्र आज स्वच्छ भारत योजनेअंतर्गत देशात ११ कोटी शौचालय बांधून झाले आहेत.

त्याचाही वापरही सुरु आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी महिला सुरक्षित झाल्या आहेत. असे प्रतिपादन आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले आहे. (Dr Bharati Pawar statement Millions of women are safe because of toilets nashik)

‘मेरी मिट्टी, मेरा देश’ अभियानांतर्गत कळवण पंचायत समितीतर्फे अमृतकलश यात्रा शहरातून काढण्यात आली. या प्रसंगी डॉ. पवार बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी कळवण एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब शिंदे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, तहसीलदार रोहिदास वारुळे, गटविकास अधिकारी डॉ.नीलेश पाटील उपस्थित होते.

डॉ.पवार म्हणाल्या की, अनेक मुली, महिलांना शौचासाठी उघड्यावर जावे लागत होते. त्यामुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात आली होती. यावर उपाय म्हणून केंद्राने अनुदान देऊन ‘हर घर शौचालय’ योजना राबविल्याने महिलांना सुरक्षा मिळाली आहे.

यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होऊन आरोग्यही सुधारले आहे. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता देशाला स्वातंत्र मिळावे यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीर व शूरवीरांना नमन व आदरांजली वाहण्यासाठी हे अभियान देशभरात राबविले जात आहे.

देशाच्या कान्याकोपऱ्यातून आणलेल्या या मातीतून दिल्ली येथे अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे. ही वाटिका एक भारत श्रेष्ठ भारत या वचनेच प्रतीक आहे.

यापुढेही देशात एकोपा राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामुळे देशाला महासत्ता बनविण्यासाठी सर्वानी मोदींचे हात बळकट करा असे आवाहन डॉ. पवार यांनी केले. सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे व कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

Union Minister of State for Health Dr. Other officials next to Bharti Pawar
Nashik: पालखेड कालव्याच्या पाट पाण्यासाठी प्रहारचे उपोषण! गरज असताना, पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार

अमृत कलश यात्रा कळवण स्थानक परिसरात सुरु होऊन मेनरोड, डॉ. न्यारती चौक ते का.ज.पाटील चौकात नेण्यात आली. या ठिकाणी यात्रेचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आणलेल्या अमृत कलशाचे पूजन करण्यात आले.

यात्रेत आर.के.एम विद्यालय कळवण, जनता विद्यालय मानूर, शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी पंचायत समितीच्या ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बचत गटाच्या सदस्यासह इतर विभागांनी देखील सहभाग नोंदविला.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, राजेंद्र ठाकरे, शहराध्यक्ष निंबा पगार, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष एस. के. पगार, गोविंद कोठावदे, विकास देशमुख, हितेंद्र पगार, हेमंत रावले, चेतन निकम, कृष्णकांत कामळस्कर, सचिन सोनवणे, बेबीलाल पालवी, रमेश कुवर आदी उपस्थित होते.

सुळे येथील आदिवासी महिलांनी वेधले लक्ष

सुळे (ता.कळवण) गावातील महिलांनी अमृत कलश यात्रेत आपल्या पारंपरिक फडकीचा समावेश करून आदिवासी पेहराव करीत सहभाग नोंदवला.

यामुळे सार्वजनिक कार्यक्रमात आपल्या संस्कृतीचे दर्शन घडल्याने आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या महिलांचे कौतुक केले. या महिलांनी केलेले आदिवासी नृत्य अमृत कलश यात्रेचे आकर्षण ठरले.

Union Minister of State for Health Dr. Other officials next to Bharti Pawar
MNS Toll Plaza Agitation: पिंपळगाव टोलनाक्यावर मनसेचे आंदोलन; टोलचे दांडे बाजूला सारून वाहनांना मोफत प्रवास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com