Dr. Bharati Pawar: मोदींचे सरकार गरीब जनतेचे कैवारी : डॉ. भारती पवार

दिंडोरीत अमृतकलशाची शोभायात्रा
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.esakal

दिंडोरी : मोदींचे शासन गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवत असून, मागील दोन वर्षांपासून ८० कोटी जनतेला मोफत रेशन पुरवठा केला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

दिंडोरी पंचायत समितीत ‘आझादी का अमृतमहोत्सव’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर गटविकासाधिकारी नम्रता जगताप, तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक गटविकासाधिकारी चंद्रकांत हजारी, नगराध्यक्ष मेघा धिंदळे, भाजप जिल्हाध्यक्ष विलास बच्छाव, नगरसेवक नितीन गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. (Dr. Bharati Pawar statement Modi government poor peoples representative nashik)

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पंचायत समितीतर्फे गटविकासाधिकारी नम्रता जगताप यांनी भारती पवार व मान्यवरांचा सत्कार केला. गटविकासाधिकारी नम्रता जगताप यांनी प्रास्ताविक केले.

आझादी का अमृतमहोत्सवांतर्गत दिंडोरी तालुक्यात राबविलेल्या उपक्रमांची माहिती सादर करून १२५ ग्रामपंचायतींतर्गत गावामधून ‘मेरी माटी मेरा देश’, मातीचे अमृतकलश आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. श्री. देशमुख व शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. विलास बच्छाव व नितीन गांगुर्डे यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. भारती पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. जनतेची दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. २०१४ पूर्वी शेतीचे बजेट २१ हजार कोटी होते. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सव्वा लाख कोटींचे बजेट आणले.

युरिया खत भारतात सवलतीच्या दरात २६६ रुपयास मिळते, तर पाकिस्तानमध्ये युरियाचा दर ८०० रुपये, चीनमध्ये २००० रुपये दर आकारला जातो, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Nashik News: CAसाठी आता 3 विषयांचा ग्रुप : अनिकेत तलाटी

सर्वसामान्य लोकांना आरोग्याच्या सुविधा पुरविल्या जात असून, आयुष्यमान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातात. कोरोना काळात १०० पेक्षा अधिक देशांना भारताने लसीचा पुरवठा केला. अनेक लोकांना जीवदान दिले, असे पवार यांनी नमूद केले.

कल्पना गांगोडे, श्याम सुरकुटे, उज्वला उगले, डॉ. राजेंद्र वराडे, नरेंद्र जाधव, गंगाधर निखाडे, योगेश बर्डे ,रणजित देशमुख, विलास देशमुख, योगेश मातेरे, काका वडजे, भास्कर गवळी, गणेश गवळी, पंढरीनाथ पिंगळे, कक्षाधिकारी महेश काटकर, नितीन दळवी, अरविंद भोर, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी, आरोग्याधिकारी डॉ. सुभाष मांडगे, शिक्षण विस्ताराधिकारी कैलास पगार,वं दना चव्हाण, सुनीता आहिरे, ज्ञानेश्वर क्षीरसागर आदी उपस्थित होते.

जनता विद्यालयातून अमृतकलश शोभायात्रा काढण्यात आली. गुरूकुल इंटरनॅशनल शाळेचे ढोलपथक, जनता इंग्लिश स्कूलचे लेझीम पथक, गोल्डन डे शाळेचे एनसीसी, नेव्हल पथक, स्वातंत्र्यवीरांचे वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, आदिवासी नृत्यामुळे शोभायात्रा लक्ष वेधून घेणारी ठरली.

Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar.
Nashik: नाशिकमध्ये पुन्हा 6 कोटींचा ‘एमडी’ जप्त! ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाऊ : पोलिस उपायुक्त मोनिका राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com