Nashik News: वेस्टर्न घाटात आठशे जातींचे पतंग कीटक : डॉ. सचिन गुरुळे

Speaking in Nisarga Katta, Dr. Sachin Gurule. Neighbors Sandeep Kale, Amol Darade etc.
Speaking in Nisarga Katta, Dr. Sachin Gurule. Neighbors Sandeep Kale, Amol Darade etc.esakal

चांदोरी : वेस्टर्न घाटात आठशे जातीचे पतंग कीटक आढळले असून, जगभरात फुलपाखराच्या १५ हजार जाती आहेत. पतंगाच्या भारतात बारा हजार जाती असून, त्याचा अभ्यास ब्रिटिशांनी केला आहे.

त्याच्यातील ७८९ जाती महाराष्ट्रातील आहेत. इंग्लंडमधील म्युझियममध्ये हे कीटक आज बघावयास मिळतात. इंग्रज भारत सोडून गेल्यानंतर कीटकांचा अभ्यास पाहिजे तसा न झाल्याची खंत कीटक अभ्यासक डॉ. सचिन गुरुळे यांनी व्यक्त केली. (Dr Sachin Gurule statement Eight hundred species of moth insects in Western Ghats Nashik News)

नेचर क्लब ऑफ नाशिक व नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य वन विभागातर्फे नांदूरमध्यमेश्वर येथे झालेल्या निसर्ग कट्यात ‘पतंग किटकाचे अनोखे विश्व’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्रा. आनंद बोरा, वनरक्षक संदीप काळे, आशा वानखेडे, अमोल दराडे आदी उपस्थित होते.

डॉ. गुरुळे म्हणाले, की परदेशातून ज्याप्रमाणे पक्षी स्थलांतर करतात, त्याप्रमाणे हॉकमॉथ पतंग पक्ष्यांसारखे ५४ किलोमीटर ताशी वेगाने स्थलांतर करीत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

रात्री दिव्याकडे आकर्षित होणारा कीटक म्हणजे फुलपाखराचा मोठा भाऊ मॉथ. त्याला मराठीत पतंग म्हणतात. पतंगांचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गातील खवलेपंखी लेपिडोप्टेरा गणात होतो.

त्यांना काही वेळा ‘पाखरू’ किंवा ‘पाकोळी’, असेही म्हटले जाते. पतंग आणि फुलपाखरे एकमेकांना जवळचे असून, ते एकाच गणातील आहेत. महाराष्ट्रात पतंगांची विविधता आणि संख्या फुलपाखरांच्या तुलनेत जास्त आहे.

बहुतेक पतंग निशाचर आहेत. मात्र, त्यांच्या काही जाती दिनचर, तर काही दिननिशाचर आहेत. वटवाघळाचे मुख्य खाद्य मॉथ आहे. हे कीटक चंद्रप्रकाशाचा उपयोग नेव्हिगेशन म्हणून करतात. यामुळेच बल्बसमोर मॉथ नेहमी दिसतात.

Speaking in Nisarga Katta, Dr. Sachin Gurule. Neighbors Sandeep Kale, Amol Darade etc.
Nashik News: LTT - मुझफ्फरपूर विशेष ट्रेन

त्यांना तो चंद्र वाटत असल्याने ते त्याच्या आजूबाजूला फिरताना दिसतात. या किटकाची अळी विषारी असते, तसेच ९० टक्के मॉथ जमिनीत कोश करतात. पतंगाचे आयुष्य सात ते १५ दिवसांचे असते.

मादी नरापेक्षा जास्त दिवस जगते. विशेष म्हणजे हे पतंग चक्क फुलपाखराची मिमिक्री करतात. या कीटकाअळी भाजीपाला फस्त करीत असल्याने अनेकवेळा शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशके मारतो.

तसे न करता शेतात हेलोजन दिवा आणि पांढरे कापड लावून जमिनीवर रॉकेल टाकल्यास ही कीड नियंत्रणात येतात.

गेल्या दोन वर्षांपासून अनियमित पडणाऱ्या पावसामुळे या किटकाचे जीवनचक्र बदलत आहे. त्यांचा प्रजनन काळ मार्च ते जून असताना, तो आता पुढे दोन महिने सरकला आहे.

वनरक्षक संदीप काळे यांनी स्वागत केले. प्रा. आनंद बोरा यांनी प्रास्ताविक केले. गंगाधर आघाव यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने, भीमराव राजोळे, रवींद्र वामनाचार्य, राजेंद्र तोडकर, डॉ. संध्या तोडकर, पंकज चव्हाण, विकास गारे, रोहित मोगल, रोशन पोटे, प्रमोद पाटील, गणेश वाघ, केशव नाईकवाडे, राहुल वडघुले आदी उपस्थित होते.

Speaking in Nisarga Katta, Dr. Sachin Gurule. Neighbors Sandeep Kale, Amol Darade etc.
Nashik News: 2 कोटी 56 लाखांची कामे येवला मतदारसंघात मंजूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com