World Cancer Day 2024 : स्तनांचा कर्करोग

फेब्रुवारी ‘वर्ल्ड कॅन्सर डे’निमित्त आपण कर्करोगासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊ या.
world-cancer-day
world-cancer-dayesakal

World Cancer Day 2024 : फेब्रुवारी ‘वर्ल्ड कॅन्सर डे’निमित्त आपण कर्करोगासंदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊ या. - डॉ. सुलभचंद्र भामरे, कॅन्सर सर्जन एम.एस., डी.एन.बी. सुपरस्पेशालिस्ट इन कॅन्सर सर्जरी

(Dr Sulabhchandra Bhamre article on Breast Cancer on world cancer day 2024 nashik news)

स्तनाचा कर्करोग स्त्रियांमध्ये सर्वांत जास्त आढळणारा कर्करोग आहे. जगात आढळणाऱ्या कर्करोगाच्या रुग्णांमध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्तनांचा कर्करोग दुसऱ्या क्रमांकावर आहे. बऱ्याचदा ही गाठ, आजार काही त्रास झाल्यावरच लक्षात येतो.

१) वय : वाढत्या वयाबरोबरच स्तनांच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो; परंतु आजकाल तरुण स्त्रियांमध्येही याचे प्रमाण वाढले आहे.

२) फॅमिली हिस्ट्री : आपल्या घरात (रिलेटिव्ह) म्हणजेच आई, मावशी, बहीण, आजी यांना स्तनांचा कर्करोग झालेला असल्यास.

३) कोणत्याही प्रकारची हॉर्मन थेरपी पूर्वी घेतलेली असल्यास.

४) मूल उशिरा होणे किंवा मुलांना स्तनपान न करणे, मद्यपान, धूम्रपान, व्यायामाचा अभाव.

world-cancer-day
World Cancer Day : कर्करोगाचे निदान होण्याचे प्रमाण वाढतेय ; जागतिक कर्करोग दिन,महिलांनीही दक्ष राहण्याची गरज

लक्षणे : १) स्तनात कोणत्याही प्रकारची गाठ/ कडकपणा जाणवणे, २) स्तनाच्या आकारात परिवर्तन, ३) स्तनाग्रातून रक्त येणे, ४) काखेत गाठ जाणवणे.

वरीलपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास आपण त्वरित योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. बऱ्याचदा पाळी येण्याच्या आधीही काही मुलींना, स्त्रियांना स्तनांमध्ये कडकपणा जाणवतो.

म्हणून पाळी येऊन गेल्यावर एकदा सहा/ सातव्या दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन (स्वयं स्तन तपासणी) करून घ्यावी. या तपासणीत आपल्याला काही आढळून आल्यास घाबरून न जाता किंवा मला काही आजार असूच शकत नाही, अशी स्वत:ची समजूत न घालता स्तनांची तपासणी करून घ्यावी.

तपासणी

(मॅनोग्राफी) : या तपासणीद्वारे आपल्याला स्तनांमध्ये आढळणाऱ्या छोट्यातल्या छोट्या गाठीही दिसू शकतात. त्यामुळे कर्करोगाचे निदान आपणास लवकर होऊ शकते.

world-cancer-day
World Cancer Day 2024 : सकारात्मक जीवनशैलीच रोखेल कर्करोग

उपचार

स्तनांच्या कर्करोगासाठी

१) सर्जरी (शल्यचिकित्सा)

२) किमो थेरपी

३) रेडिओ थेरपी

४) हॉर्मोन थेरपी

या उपचार पद्धती असतात. कर्करोगाच्या स्टेजनुसार यातील पर्याय रुग्णाला दिला जातो. थोडक्यात सांगायचे झाल्यास नियमित व्यायाम, योग्य आहार, पुरेशी झोप, सकारात्मक विचारसरणी हा आपल्या जीवनशैलीचा भाग हवा. वर सांगितल्याप्रमाणे कोणतीही लक्षणे आपल्याला आढळल्यास त्वरित योग्य डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला घ्यावा.

world-cancer-day
World Cancer Day 2024 : भारतीय महिलांना या 5 प्रकारच्या कर्करोगांचा सर्वाधिक धोका, असा करा बचाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com