डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड; संदीप वाजेचा साथीदार गजाआड | Crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Suvarna Waje burning massacre

डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड | संदीप वाजेचा साथीदार गजाआड

नाशिक/ इगतपुरी शहर : डॉ. सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड प्रकरणात संशयित पती संदीप वाजे याचा साथीदार यशवंत म्हस्के यास तपासी पथकाने आज गजाआड केले. त्यास उद्या (ता.१७) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, संशयित संदीप वाजे याची पोलिस कोठडी आज संपल्याने त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. (Dr. Suvarna Waje burning massacre)

मोरवाडी (नाशिक) मनपा रूग्णालयातील वैद्यकिय अधिकारी सुवर्णा वाजे जळीत हत्याकांड प्रकरणात संशयित आरोपी पती संदीप वाजे यांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली होती. संदीप वाजे यास न्यायालयाने एकूण १३ दिवस पोलिस कोठडी दिली. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, तपासी अधिकारी निरीक्षक अनिल पवार व पथकाने महत्वपूर्ण धागेदोरे मिळवित तांत्रिक विश्‍लेषणाच्या मदतीने संशयित वाजेचा साथीदार यशवंत म्हस्के यास बुधवारी (ता.१६) अटक केली. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, संशयित संदीप वाजे यास इगतपुरी न्यायालयात हजर केले. अॅड. दिलीप खातळे यांनी संशयित आरोपीच्या वतीने बाजू मांडताना पोलिस कोठडी दोन- तीन नव्हे तर १३ दिवस देण्यात आली आहे. यामुळे आता पोलिस कोठडी देणे उचित नाही. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत संशयित वाजे यास न्यायालयीन कोठडी सुनावली.

हेही वाचा: BMCची नोकरी अडीच लाखाला पडली; नाशिकच्या युवकाला दोघांनी गंडवले

''तर माझी नार्को टेस्ट करा'' - संदीप वाजे

दरम्यान, सुनावणीनंतर संशयित वाजे यांची न्यायालयातून बाजू मांडणारे विधीतज्ज्ञ दिलीप खताळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले, की
वैद्यकीय अधिकारी सुवर्णा वाजे यांचा मृतदेह वाडीवर्हे शिवारात गाडीसह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणात त्यांचे पती संदीप याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र १४ दिवसांमध्ये पोलिस काहीही निष्पन्न करू शकले नाही. संदीप वाजे याने न्यायालयाला सांगितले की, मी कोणताही गुन्हा केला नाही. जर तुम्हाला वाटत असेल मी गुन्हा केलेला आहे तर माझी नार्को टेस्ट करा, अशी इच्छा संदीप याने व्यक्त केली असल्याचे ॲड. खातळे यांनी पत्रकारांना दिली.

संशयित साथीदाराचा शोध

तांत्रिक विश्‍लेषण तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित संदीप वाजे याचा साथीदार यशवंत म्हस्के यास तपासी अधिकारी पवार यांनी अटक केली. उद्या त्यास न्यायालयात केले जाणार आहे. गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असून महत्वपूर्ण माहिती त्याच्याकडून मिळेल असा विश्‍वास तपासी पथकाकडून व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा: डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड ; संशयित संदीप वाजे याने लग्नातील अडथळा केला दूर

''संदीप वाजे याची नाशिक रोड येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.१७) नाशिक येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहे.'' - ॲड. दिलीप खातळे, संशयिताचे वकील

Web Title: Dr Suvarna Waje Massacre Sandeep Wajes Companion Arrested Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikcrimemurderDivorce
go to top