कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

dr. umesh nikam.jpg
dr. umesh nikam.jpg

नाशिक : मालेगावला खासगी रुग्णसेवा देतानाच समाजासाठी काही देणं लागतो, असा विचार करून आरोग्यनिदान शिबिरं भरवायचो. लोकांना मदत करायचो. अशा समविचारी व तळमळीनं काम करणाऱ्या आम्हा मंडळींची एक टीमच तयार झाली. पण हे करताना सावधगिरी बाळगल्यानंतरही माझ्यासह कुटुंबातल्या आठ सदस्यांना कोविड-19 विषाणूनं कवेत घेतलं. ही लढाई आम्ही निकरानं लढलो...

गरज होती मानसिक आधाराची...

मी डॉ. उमेश निकम, दाभाडी इथला... मालेगाव शहराच्या मध्यवस्तीत गांधी मार्केटमध्ये चार वर्षांपासून रुग्णसेवा करतो आहे. कोरोनाची लक्षणं दिसू लागताच डॉ. अभय निकम व डॉ. पुष्कर इंगळे यांच्या मार्गदर्शनाने औषधे व मानसिक आधार मिळाला. चाचणी घेतली तर पॉझिटिव्ह आली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला पहिला रुग्ण. परिसरात भीतीचं सावट पसरलं. माझ्या संपर्कातल्या तब्बल 54 जणांची तपासणी झाली. त्यात घरातले काही, काही शेजारी व सतत संपर्कात असलेले भावकीतले मिळून आठजण कोरोनाग्रस्त आढळले. भीतीचे ढग अधिक गडद झाले. मानसिक आधाराची गरज होती. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या फोनसह अनेकांनी तो आधार दिला. अनुभवी सरकारी डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली कोरोना विरोधात आम्हा मंडळींची निकराची लढाई सुरू असताना बाहेर मात्र सामाजिक बदनामीचा विषाणू थैमान घालत होता. आम्हाला जणू वाळीत टाकण्यात आलं होतं. 

दुभत्या गायी- म्हशींचं दोन्ही वेळचं मिळून चाळीस-पन्नास लिटर दूध तब्बल पंधरा दिवस अक्षरशः उकिरड्यावर फेकावं लागलं. शेतमळ्याचे रस्ते बंद करण्यात आले होते. विषाणूची बाधा न झालेल्या कुटुंबातल्या सदस्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्याचवेळी राजकीय, सामाजिक स्तरावर अनेकांनी आधार दिल्याने ही मोठी लढाई निकम परिवारानं जिंकली. आता आम्ही नवा जन्म अनुभवत आहोत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com