esakal | तो प्रकार पुन्हा नको; डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आता रुग्णांना बेडअभावी वेटिंग

बोलून बातमी शोधा

dr zakir hussain hospital
तो प्रकार पुन्हा नको; डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात आता रुग्णांना बेडअभावी वेटिंग
sakal_logo
By
- युनूस शेख

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात (dr Zakir Hussain hospital nashik) रुग्णांची वाढती गर्दी बघता बेडसंख्या (bed shortage) अपुरी पडत आहे. नवीन आलेल्या रुग्णांना (patients) बेडअभावी वेटिंग (waiting) करावी लागत आहे. अशा वेळेस रुग्ण दगावण्याची शक्यता आहे, असे प्रकार घडू नये, यासाठी येथील बेडसंख्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील बेडसंख्या वाढवण्याची मागणी

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात पूर्वीपासून उपचारास असलेल्या रुग्णांमुळे रुग्णालय फुल आहे. काही रुग्णांवर बेडअभावी जमिनीवर उपचार केले जात आहेत. तसेच दैनंदिन शहरातील बाधितांचे प्रमाण वाढत असून, नवीन रुग्णांकडून उपचारासाठी रुग्णालय आवारात गर्दी होत आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्याची मागणी रुग्णांचे कुटुंबीय करत आहे. परंतु बेडसंख्या अपुरी असल्यामुळे रुग्णालय प्रशासनाकडून त्यांना अन्य रुग्णालयांत जाण्याचा सल्ला दिला जात आहे. अशावेळी उपचाराअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. असे प्रकार घडू नये, आलेल्या प्रत्येकास उपचार मिळावा. यासाठी येथील बेडसंख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहे. त्यासाठी रुग्णालय असलेल्या बाह्यरुग्ण विभागाच्या विविध रूममध्ये नवीन बेड उपलब्ध करून त्याठिकाणी रुग्णांना दाखल करावे, जेणेकरून भविष्यात अनुचित प्रकार घडणार नाही. बेड वाढविल्यास रुग्णांचे कुटुंबीय आणि कर्मचारी यांच्यामध्ये होणारे वाददेखील होणार नाहीत.

हेही वाचा: ग्राउंड रिपोर्ट : नाशिक-जळगाव सीमेवर ‘आओ जाओ घर तुम्हारा’!

कुटुंबीयांकडून जबरदस्ती

रुग्णांच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढू नये, यासाठी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णांना भेटण्यास किंवा त्यांना जेवणाचे डबे देण्यास बंदी केली आहे, असे असताना कुटुंबीयांकडून कर्मचाऱ्यांशी वाद घालत जबरदस्ती रुग्णांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कर्मचारी आणि कुटुंबीयांमध्ये वाद होत असतो. गुरुवारीदेखील अशाप्रकारे वाद झाल्याने त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. कुटुंबीयांनी असे प्रकार करू नये, अशी विनंती रुग्णालय कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे.

हेही वाचा: रात्रीस खेळ चाले! लपून-छपून रात्री 12 नंतरही व्यवसाय