
महापालिका निवडणुकांसाठी 23 जूनला प्रारूप मतदार याद्या
नाशिक : निवडणूक आयोगाने (Election Commission) राज्यातील १४ महापालिकांचा सार्वत्रिक निवडणुकीसाठी (NMC general elections) मतदार यादी (Voters List) तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार पुढील महिन्यांत ९ जुलैला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर होणार आहे. यामुळे इच्छुकांच्या प्रचाराला पुन्हा गती येणार आहे. (Draft voter lists for nmc elections on 23rd June Nashik News)
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेसह बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती व नागपूर अशा १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याबाबत कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने सम क्रमांकाचे २ जूनच्या आदेशानुसार राज्यातील १४ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २३ जूनला प्रभागनिहाय प्रारूप, तर ९ जुलैला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १६) जाहीर केला.
हेही वाचा: Nashik : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त पेट्रोलवर 54 रुपयांची सूट
प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १ जुलैपर्यंत आहे. अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या ९ जुलैला प्रसिद्ध होईल. गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांना आता प्रचाराला गती देता येणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यापासून अनेक इच्छुक तयारीला लागले आहेत. पण या ना त्या कारणाने तयारीत असलेल्या इच्छुकांना थांबा मिळत गेला. आता मात्र निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट संकेत मिळाल्याने आणि मतदार कोण हेही स्पष्ट होणार असल्याने इच्छुकांच्या तयारीला पुन्हा गती येणार आहे.
हेही वाचा: 1 हजार वाहनांवर GPS प्रणाली; नोंदणीसाठी 31 जुलैपर्यंत मुदत
Web Title: Draft Voter Lists For Nmc Elections On 23rd June Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..