नाशिक : रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच पाण्याचा निचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Smart City

नाशिक : रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच पाण्याचा निचरा

नाशिक : प्रत्येक पावसामध्ये सराफ बाजार व दहिपूल भागात पाणी साचत असल्याचे तक्रारी होत असल्या तरी प्रत्यक्षात स्मार्टसिटीच्या (Smart city) गावठाण विकास योजनेअंतर्गत (Gaothan Vikas Yojana) अद्यापही १३१ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. जोपर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत सराफ बाजारात पाणी तुंबणे बंद होणार नाही. असे स्पष्टीकरण स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिले. (Drainage of water only after completion of road works Smart City Work Nashik News)

स्मार्टसिटी मिशन अंतर्गत सिटी लेवल ॲडव्हायसरी फोरम नियुक्त करण्यात आलेला आहे. या फोरमची सहावी बैठक ऑनलाइन झाली. या वेळी फोरममध्ये सराफ बाजारातील पाणी तुंबण्याच्या प्रकारावर विचारणा करण्यात आली. या वेळी स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, स्मार्टसिटीअंतर्गत गावठाण विकास योजना राबविली जात आहे. गावठाण विकास योजनेअंतर्गत १७१ रस्ते तयार केले जाणार आहेत. एकूण रस्त्यांपैकी आतापर्यंत ४० रस्त्यांची कामे सुरू आहे. रस्ते तयार करताना केबल डकट, ड्रेनेज पाइपलाइन आदींची सुविधा पुरविली जात आहे. गावठाणातील रस्ते छोटे असल्याने कामे करताना अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात विलंबदेखील होत आहे. धुमाळ पॉइंट ते दहिपूल या एकमेव रस्त्याचे काम झाले आहे. अद्यापही १३१ रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. पावसाळ्यानंतर ही कामे सुरू होतील. गावठाणातील संपूर्ण १७१ रस्त्यांची कामे पूर्ण होत नाही, तोपर्यंत गावठाणातील संपूर्ण पाण्याचा निचरा होणार नाही.

शहरात पर्यावरण सेंसर

शहरात २६ पर्यावरण सेन्सर पोचविण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता, परंतु केंद्र सरकारने पर्यावरण सेन्सर बसवून याला स्थगिती दिली होती. मात्र, स्मार्टसिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यांनी स्थगिती उठवली आहे. त्यामुळे स्मार्ट प्रकल्पांतर्गत २६ ठिकाणी सेंसर बसविले जाणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली. अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मेकॅनिकल गेट बसण्याचे काम सुरू आहे. गेटचे सुट्टे भाग अमेरिकेतून मागविले जात आहे. भूमिगत करण्याच्या कामाला मान्यता मिळाली असून, ते काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली.

हेही वाचा: बिनशर्त स्‍वीकार्हता नसल्‍याने नात्‍यात कटुता : डॉ. मोहन आगाशे

नवीन ४७ सिग्नल

शहरातील वाढत्या वाढत्या वाहतुकीला वळण लावण्यासाठी नव्याने ४७ सिग्नल बसविले जाणार आहे. स्मार्टसिटीअंतर्गत प्रारंभी ४० सिग्नल बसविले जाणार होते. आता त्यात नव्याने सात सिग्नलची भर घालण्यात आली असून, एकूण ४७ सिग्नल बसविले जाणार आहे. बैठकीला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सेक्रेटरी विनी दत्ता, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट चेअरमन रसिक बोथरा, नाशिक युवा फाउंडेशनचे स्वप्नील येवले, नाशिक युथ क्लबचे रविराज लभडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पंचाळेत ढगफुटीने फुटला बंधारा

Web Title: Drainage Of Water Only After Completion Of Road Works Smart City Work Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikRoad Construction