esakal | आरपीआय ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांना चालकाने लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

Ozar Crime News

आरपीआय ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षांना चालकाने लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
उत्तम गोसावी

ओझर (जि. नाशिक) : आजपर्यंत खाते हॅक करणे, फोन करून मी बँकेतून बोलतो, तुमचे अकाउंट डेथ झाले, एटीएमचा व कार्डचा नंबर सांगा, पीन नंबर सांगा असे सांगून खात्यातून पैसे काढल्याचे, खोटे धनादेश दिल्याचे किस्से ऐकले आहेत. परंतु, चालकानेच मालकाच्या गाडीतील एटीएम वापरून पैसे लुबाडल्याचा प्रकार ओझर येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. (driver stole money from the ATM of the district president of RPI rural)

नेमके काय झाले?

याबाबत माहिती अशी की, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विनोद जाधव कामानिमित्त फिरत असताना गाडीत डिझेल टाकण्यासाठी एटीएमचा वापर करत असायचे. त्या कार्डचा वापर चालक योगेश दिवे करायचा. त्यामुळे एटीएम कार्ड नेहमीच गाडीतील बॉक्समध्येच असायचे. दरम्यान, विनोद जाधव यांचे बंधू अनिल जाधव आजारी होते. त्या धावपळीत त्यांचा मोबाईल खाली पडल्याने डिस्प्ले फुटला. दुरुस्तीला दुकाने उघडे नसल्यामुळे धावपळीत त्यांनी मोबाईलवर मॅसेज पाहिलेच नाही. बंधू अनिल जाधव यांना वाचविण्यासाठी त्यांची धावपळ चालू होती. परंतु, शेवटी त्यांचे निधन झाले. याच संधीचा फायदा घेत योगेश दिवे याने वेळोवेळी एटीएमचा पीन लक्षात ठेवून डिझेल टाकण्याच्या नावाखाली एटीएममधून दोन लाख ७० हजार रुपये काढले. घरातील दुःखाचे सावट निवळल्यावर बँकेतून पैसे काढतेवेळी स्टेटमेंट घेऊन बॅलन्स चेक केला असता जाधव यांच्या ही बाब लक्षात आली. आपले एटीएम कार्ड चालकच वापरत होता. त्याला पीन नंबरही माहित होता, हे लक्षात आल्यावर जाधव यांनी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार योगेश दिवे यांस शिगवे येथून ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या. स्टेटमेंटवरील माहितीनुसार कोणत्या एटीएममधून पैसे काढले, याचा शोध ओझरचे पोलिस निरिक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

हेही वाचा: नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद; नागरिकांच्या चकरा सुरूच

मी आणि माझा चालक यालाच एटीएम व पीन नंबर माहिती होता. भावाला वाचविण्याच्या गडबडीत असल्याने व मोबाईलचा डिस्प्ले फुटल्याचा फायदा घेत चालकाने संधी साधली. मी फसलो असे कुणीही फसू नका. अतिविश्‍वास दाखवल्याचा गैरफायदा घेतला. तब्बल दोन लाख ७० हजारला बुडालो. पोलिसांवर माझा विश्‍वास आहे, ते योग्यरित्या तपास करतील.

- विनोद जाधव, जिल्हाध्यक्ष, आरपीआय (ग्रामीण)

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्‍यूकोरमायकोसिस'चे नवे संकट; मधूमेह बाधितांना सावधगिरीचा इशारा

loading image
go to top