विनाहेल्मेट पेट्रोल भरणाऱ्यांना दणका; ७२ चालकांचे परवाने होणार रद्द

no helmet no petrol
no helmet no petrolesakal

नाशिक : स्वातंत्र्य दिनापासून विनाहेल्मेट पेट्रोल भरण्यास प्रतिबंध केल्यानंतरही विनाहेल्मेट पेट्रोल भरणाऱ्या, तसेच पोलिसांना खोटी माहितीचे फॉर्म भरून देणाऱ्या शहरातील ७२ जणांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द होणार आहे. पोलिस आयुक्तालयातर्फे प्रादेशिक परिवहन विभागाला तसा प्रस्ताव दिला आहे.

नाशिक शहरात २०१७ ते २०२१ या पाच वर्षात ७८२ अपघातात ८२५ जणांना प्राण गमवावा लागला. ८२५ पैकी ४६७ मृत्यू दुचाकीस्वाराचे होते. त्यात ३९४ जणांनी हेल्मेट घातलेले नसल्याने त्यांचे मृत्यू झाले होते. दुचाकी चालकांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती डोळ्यासमोर ठेऊन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वातंत्र्य दिनापासून नाशिक शहरात हेल्मेट वापर सक्तीचा केला आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पेट्रोलच न देण्याचा आदेश

शहरात लागू केला आहे. १५ दिवसांपासून सुरू झालेल्या या नियमाला शहरात ८० टक्क्यांच्या आसपास प्रतिसाद मिळत असला तरी, राहिलेल्या २० टक्क्यांच्या आसपास बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध शहर पोलिसांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे.

no helmet no petrol
नाशिक : ४६ लाख रुपये जुगारामध्ये हरलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा

भरली खोटी माहिती

शहरात स्वातंत्र्य दिनापासून विनाहेल्मेट पेट्रोल भरणाऱ्यांना पेट्रोलपंपावर विशिष्ट फॉर्म भरून द्यावा लागतो. मात्र, काही वाहनधारकांनी त्या फॉर्ममध्येही खोटी माहिती भरून विनाहेल्मेट पेट्रोल भरल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी विनाहेल्मेट पेट्रोल भरलेल्या वाहन चालकांच्या फॉर्मची माहिती खातरजमा करण्यास सुरवात केली असून, फॉर्मवर खोटी माहिती भरल्याचे पुढे येत आहे. अशा वाहनधारकांवर १९८८ च्या कलमातील १२९, १७७ नुसार दंडात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. त्यानुसार शहर पोलिसांनी शहरातील विनाहेल्मेट पेट्रोल भरलेल्या ७२ जणांचे वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला प्रस्ताव पाठविले आहे. त्यामुळे लवकरच प्रादेशिक परिवहन विभागाकडून संबधितांचे वाहन चालविण्याचे परवाने रद्द होणार आहे.

no helmet no petrol
जनआशीर्वाद यात्रेत आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com