Nashik News: आधीच दुष्काळ, त्यात वाळूउपसा नकोच! कळवण तालुक्यातील शेतकरी वाळूलिलावप्रश्नी आक्रमक

sand auction
sand auctionesakal

कळवण : तालुक्यात सरसरीपेक्षा कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. तालुक्यातील गिरणा नदीवरील वाळू लिलाव आणि उपसा झाल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.

भूजल पातळीवर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे शेतीचा विचार करून सर्व वाळू लिलाव तात्काळ रद्द करावेत अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्यासह शेतकरी वर्गाने केली आहे. (drought Farmers in Kalwan taluka aggressive on sand auction issue Nashik News\)

यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे, भूजल पातळी खालावल्याने विहिरींनाही पाहिजे त्याप्रमाणात पाणी उतरलेले नाही. रब्बी हंगामातील सर्व पिकांना शेवटचे पाणी मिळेल की नाही याची शाश्वती नाही.

गिरणा नदीपात्रावर अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांच्या विहीरी आहेत. त्यामुळे गिरणा व पुनंद नदी पात्रातील वाळू उपसा झाल्यास त्या त्या भागात सुरवातीपासूनच तीव्र पाणी टंचाई जाणवणार आहे.

त्यामुळे शासनाने यंदाचे पर्जन्यमान व तालुक्यात सरासरीपेक्षा कमी झालेला पाऊस याचा विचार करून यंदाचे वाळू लिलाव शेतकऱ्यांच्या शेतीचा विचार करून तात्काळ स्थगित करावेत. अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

रात्रीच्या चोरांवर कारवाई

तालुक्यात गिरणा व पुनंद नदीपात्रातून अनेक ठिकाणहून रात्रीची सर्रास वाळूचोरी सुरू असते. या वाळू चोरीस आळा घालण्यात महसूल विभागाला आतापर्यत अपयश आले आहे.

मात्र उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल नरवाडे यांनी अनेक वाहनांवर दंण्डात्मक कारवाई करून गुन्हेही दाखल केले आहेत व शासनास महसूल मिळवून दिला आहे.

sand auction
Nashik Water Crisis: विकतच्या पाण्यावर तहान भागविण्याची वेळ! चुंचाळे परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा

तहसीलची यंत्रणा काय करते?

महसूल विभागाकडे गावपातळीपर्यंत यंत्रणा असताना अवैध वाळू उपसा रोखण्याच अयशस्वी झाली आहे. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंदे रोखण्यासाठी तयार केलेल्या पथकांनी अवैध दारू, जुगार, गुटखा यासोबत अवैध वाळूही रोखण्याचा प्रयत्न केला आहे.

मग तहसील कार्यालयाची कर्मचाऱ्यांची फौज कुठे कमी पडते अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये आहे. शेतकऱ्यांची कांदाचाळ, बैल गोठा, व शासकीय घरकुल योजनेसाठी वाळू वाहणाऱ्या शेतकऱ्यांवरच कारवाई का ? असा सवालही शेतकरी बांधवानी करीत आहे.

तालुक्यातील वाळूघाट

असोली, कळंमथे पाळे, पाळे खुर्द, देसगाव, जयपूर, गोसराणे, ककाने खेडगाव, कळवण.

sand auction
Nashik Water Crisis: लासलगाव विंचूरसह सोळा गावांवर पाणीटंचाईचे सावट! थकीत वीजबिलाबाबत महावितरणकडून नोटीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com