esakal | तरुणीला आई-वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव पाठविल्याने तरुणास मारहाण; नेमके काय घडले?
sakal

बोलून बातमी शोधा

love marraige 1.jpg

मालेगाव येथील रमजानपुरा भागात लग्नाचा प्रस्ताव पाठविल्याच्या वादातून तरुणास मारहाणीचा प्रकार घडला. नेमका प्रकार काय..वाचा पुढे..

तरुणीला आई-वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव पाठविल्याने तरुणास मारहाण; नेमके काय घडले?

sakal_logo
By
प्रमोद सावंत

नाशिक / मालेगाव : मालेगाव येथील रमजानपुरा भागात लग्नाचा प्रस्ताव पाठविल्याच्या वादातून तरुणास मारहाणीचा प्रकार घडला. नेमका प्रकार काय..वाचा पुढे..

माझ्या बहिणीसाठी तुझ्या आई-वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव का पाठविला?

मालेगाव येथील रमजानपुरा भागात लग्नाचा प्रस्ताव पाठविल्याच्या वादातून तरुणास मारहाणीचा प्रकार घडला. ‘बहिणीसाठी तुझ्या आई-वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव का पाठविला,’ अशी कुरापत काढून साजीद माजीद अहमद, त्याचा भाऊ हामीद माजीद अहमद (रा. हाजी अहमदपुरा) यांनी शोएब अहमद शब्बीर अहमद (वय २५, रा. रमजानपुरा) याला बेदम मारहाण केली.

हेही वाचा > दुर्दैवी! बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके?

तरुणाच्या डोक्याला मोठी दुखापत

दोघा संशयितांनी शोएब काम करीत असलेल्या यंत्रमाग कारखान्यात जाऊन लूमच्या धोट्याने मारल्याने त्याला डोक्यावर मोठी दुखापत झाली. संशयितांनी मारहाण करीत ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार जखमी शोएबने पोलिसांत दिली. रमजानपुरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा > धाबे दणाणले! नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही?कारवाई तर होणारच

दुचाकीस्वारांनी मोबाईल लांबविला 
शहरातील आझादनगर भागातील फ्लेक्स जिमखान्यासमोर २५ वर्षीय तरुणाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लुटण्याचा प्रकार घडला. मोहंमद शालिक मोहंमद सलीम (वय २५, रा. रोशनाबाद, सरदार कॉलनी) जिम करून दुचाकी (एमएच ४१, झेड ५३९९)वरून घराकडे जात असताना पाठीमागून पॅशन प्रो दुचाकीवरून आलेल्या सलमान कच्छी (पूर्ण नाव माहीत नाही) व त्याचा साथीदार अशांनी मोहंमदच्या हातातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल व मोबाईल कव्हरमधील दीड हजार रुपये असा साडेनऊ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पलायन केले. चोरटे दुचाकीवरून आझादनगर ६० फुटी रस्त्याने पळून गेले. मोहंमद शालिकच्या तक्रारीवरून सलमान कच्छी व त्याच्या साथीदाराविरुद्ध आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

loading image
go to top