Maratha Reservation: आंदोलनामुळे विद्यार्थ्यांनी घेतला धसका! बसफेऱ्या घटल्याने दिवाळीला घरी येणाऱ्यांच्या चिंतेत भर

Maratha Reservation MSRTC Bus Cancellation
Maratha Reservation MSRTC Bus Cancellationesakal

Maratha Reservation : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांकडून परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी वाहनांना लक्ष केले जात आहे.

त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये बसेस बंद करण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. शिक्षणानिमित्त पुणे, औरंगाबाद, नाशिक, नगर या जिल्ह्यांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर आंदोलनाचा धसका घेतला आहे.

त्यांना आपल्या गावी जाण्यासाठी वेळेत बसेस मिळत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. (Due to agitation students took hit Reduction in MSRTC bus trips adds to worries of those coming home on Diwali festival nashik)

मराठा आरक्षणावरून मराठवाड्यात आंदोलन तीव्र झाले आहे. जाळपोळीसह एसटी बसेस फोडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून पुण्यात शिक्षणानिमित्ताने मोठ्या संख्येने विद्यार्थी राहतात. तसेच, नाशिक आणि औरंगाबादमध्येही परजिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणानिमित्ताने आलेले आहेत. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

विद्यार्थी दिवाळी सणासाठी घराकडे येण्याच्या तयारी आहेत. मात्र, ऐन दिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाबाबतचे आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनाचा विद्यार्थ्यांनी मोठा धसका घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या आगार प्रमुखांनी मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. तसेच, औरंगाबादकडून नाशिक-पुण्याकडे जाणाऱ्या बसेसही बंद करण्यात आलेल्या आहेत.

Maratha Reservation MSRTC Bus Cancellation
Maratha Reservation : अर्धापुरात सहा गावांतील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण

नाशिक आगारातून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस गेल्या दोन दिवसांपासून बंद केल्या आहेत. तर, मंगळवारी (ता.३१) पुण्याकडे जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्याही निम्म्याने कमी केल्या होत्या.

परंतु बुधवारी त्यात काही प्रमाणात वाढ करण्यात आल्या. मराठा आरक्षणांचे आंदोलन चिघळले तर परिवहन महामंडळाच्या बसेस लक्ष्य केले जात असल्याने आंदोलन शांत होईपर्यंत बसेस बंद ठेवण्याचीही शक्यता आहे.

याच थेट परिणाम शिक्षणासाठी पुणे, औरंगाबाद, नाशिकमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. त्यांना दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी मनस्तापाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

"औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेस नाशिकमधून बुधवारीही बंदच होत्या. परंतु पुण्याकडे जाणाऱ्या बसेस पूर्ववत सुरू केल्या आहेत." - अरुण सिया, विभाग नियंत्रक, नाशिक.

Maratha Reservation MSRTC Bus Cancellation
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जिल्ह्यात ‘वज्रमूठ’; ठिकठिकाणी उपोषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com