esakal | नाशिक : चालक, वाहकाच्या समयसूचकतेने वाचले ४९ प्रवाशांचे प्राण
sakal

बोलून बातमी शोधा

bus

नाशिक : चालक, वाहकाच्या समयसूचकतेने वाचले ४९ प्रवाशांचे प्राण

sakal_logo
By
दीपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक ) : येथील शिवबाण फाट्यावर बसचालक व वाहकाच्या प्रसंगावधानतेने बसचा होणारा अपघात टळला. नामपूरहून ही बस ४९ प्रवासी घेऊन मालेगावच्या दिशेने जात होती. एका ट्रकचालकाने हुलकावणी दिल्याने ही घटना घडल्याचे प्रवाशांनी सांगितले.


धुळे जिल्ह्यातील साक्री बसस्थानकावरून साक्री-मालेगाव ही राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच ४०, एन ९०९३) सकाळी दहाला सुटणार होती. मात्र, वाहक नसल्याने अर्ध्या तासाने उशिरा धावली. ४९ प्रवासी घेऊन ही बस मालेगावच्या दिशेने जात असताना अंबासन येथील शिवबाण फाट्यावर नामपूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकने हुलकावणी दिली. यात चालक सुभाष बोरसे यांनी समयसूचकता दाखवत बस बाजूला घेतली. मात्र, पाठीमागून मोठा आवाज आल्याने वाहक सुभाष चौरे यांनी चालकास बस बाजूला थांबविण्यास सांगितले. पाठीमागील चाक निखळण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास येताच दोघेही काही वेळ स्तब्ध झाले होते. दैव बलवत्तर म्हणून आजचा होणारा मोठा अपघात टळल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. त्यांनी पुढील प्रवासासाठी प्रवाशांची सोय उपलब्ध करून साक्री बसस्थानकात माहिती देऊन मार्गस्थ झाले.

हेही वाचा: नाशिक शहर पोलिस ठाण्यांना नवे कारभारी; 3 महिला अधिकाऱ्यांचा समावेश

loading image
go to top