
येवला (जि. नाशिक) : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने खूपच मनावर घेतले असून विशेषता तालुक्याच्या पूर्व भागातील राजापूर, नगरसूल, भारम पट्ट्यात धोधो कोसळत आहे. यामुळे निम्म्याहून अधिक जमिनी उपळल्या असून शेतात पाणी साचले आहे. चार दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत असल्याने लागवड झालेले कांदे पाण्यात डुबून आहे. कांदा रोपे पिवळे पडून वाफ्यात दिसेनासे झाले असून सोंगणीला आलेला मका, सोयाबीनही पावसाने ओले होत काळे पडत आहे. इतर पिकांनाही या पावसाने नुकसान होणार असल्याने शेतकरी हतबल झाले आहेच.
पावसाळ्याच्या पहिले दोन महिने प्रतीक्षा करायललालावणार पाऊस ऑगस्टमध्ये गरजेइतका पडला मात्र सप्टेंबरमध्ये सातत्याने पाऊस पडत आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या व नांदगावच्या सीमेलगतच्या पूर्व भागातील राजापूर, ममदापूर, भारम, नगरसूल या पट्ट्यात सातत्याने पाऊस होत आहे. याउलट पश्चिम पट्ट्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. पालखेड डाव्या कालव्याला आलेल्या ओवरफ्लोच्या पाण्याने या भागात नदी-नाले भरून वाहत आहेत. मागील चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने भूजल पातळी प्रचंड वाढून उंच जमिनी वगळता खोलगट असलेल्या शेतजमिनी अक्षरशा उपळल्या आहेत. सततच्या पावसाने पाणी साचत साचून पिके सोडण्याची वेळ आली आहे.
कांदा रोपाची लागली वाट
कांदा पिकाचे तर प्रचंड नुकसान होत आहे, शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून लागवड केलेल्या कांद्याच्या पिकात रोजच पाणी साचत असल्याने मूळे खराब होत असून पात पिवळी पडून खराब होऊ लागली आहे, शेतकरी हवालदिल झाले असून कांदारोप पिवळे पडतन पिळ पडून वाफ्यातच खराब होत आहेत. वाफ्यात केलेले लागवड अर्धा अधिक खराब होत आहे. कांदा पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. ढगाळ हवामान व पावसामुळे कांद्याची रोपांची तर वाट लागल्याची ही परिस्थिती असून वाफ्यातच रोपे खाली बसू लागले आहे. मकाही पाण्याखाली गेला आहे. वरच्या पावसाने चारा सडला आहे. पाऊस सुरूच राहील्यास मक्यालाही कोंब फुटण्याची भीती आहे. सोयाबीनचेही काढणी लांबल्यास हे पीकही पाण्याखाली जाणार आहे.
राजापूर भागात ढगफुटी
आज रविवारी देखील तालुक्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. मात्र राजापूर येथे आजही सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाला असून ढगफुटी झाल्याची स्थिती होती. शनिवारी रात्रीही पाऊस झाला होता. आज पुन्हा पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने सर्वच्या सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. जमिनी उपळल्याने जिकडे पहावे तिकडे पाणीच अशी परिस्थिती आहे. पाऊस एवढ्यात न उघडल्यास पिकांची सडघाण होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करत आहेत.
असा पडला पाऊस
मागील पंधरा-वीस दिवसापासून पाऊस थांबून थांबून हजेरी लावत आहे. त्यामुळे एकट्या सप्टेंबरचाच विचार केल्यास तब्बल १३३ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस येवला मंडळात ४५७ मिलिमीटर तर त्याखालोखाल पाटोदा मंडळात ३७७ मिलिमीटर पडला आहे.अंदरसुल मडळात ३४४, नगरसूल मंडळात ३३८, सावरगावला २८४ तर जळगाव नेऊर मंडळात २९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.