Nashik News : शेतीमालाचे भाव नसल्याने आराईत राजकीय पुढार्‍यांना गावबंदी

Due to non-availability of prices of agricultural produce, political leaders in Arai are banned from villages
Due to non-availability of prices of agricultural produce, political leaders in Arai are banned from villagesesakal

Nashik News : गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याला कवडीमोल भाव तसेच भाजीपाला व अन्य शेतीमालाचे भाव कोसळल्याने आराई येथील संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजकिय पुढार्‍यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला.आराई गावाच्या प्रवेशद्वारा जवळ पुढाऱ्यांना गावबंदीचा फलक लावण्यात आला.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आराई गावातील ग्रामस्थांनी वज्रमूठ बांधली असून गावात आमदार, खासदार तसेच विविध राजकीय पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंदी करण्याचा निर्णय शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला गेल्या अनेक महिन्यापासून कांदा कवडीमोल भवानी बाजार समित्यांमध्ये विकला जात आहे.

टमाटे भाजीपाला रस्त्यावर फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली नाफेड मार्फत कांदा खरेदी केला जात असला तरी मात्र दुसरीकडे अद्यापही शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नसल्याने शेतकरी आंदोलन करत असल्याचे दिसून आले आहे. (Due to non availability of prices of agricultural produce political leaders in Arab banned from village Nashik News)

यामुळेच शेतकरी जगेल तरी कसा असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला मोठ्या आशेवर निवडून दिलेले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याऐवजी मूग गिळून बसले आहेत. तसेच बागलाण तालुक्यात गारपीट पाहणी दौऱ्यावर मुख्यमंत्री बागलाण आले असता फक्त आश्वासन देऊन कुठल्याच प्रकारची नुकसान भरपाई आजुन मिळाली नाही.

कांद्याचे अनुदान सुध्धा आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरच जमा झाले नाही अशा सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे शेतकऱ्यांना कोणी वाली नसल्याची तीव्र भावना शेतकरी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.

गावकऱ्यांनी गावाच्या प्रवेशद्वारा सह गावात ठिकठिकाणी लोकप्रतिनिधींना गावबंदीचे फलक लावले लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पुढार्‍यांनी गावास प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास कांदा फेकून व कांद्याच्या माळा घालुन त्यांचे स्वागत करणार असल्याचा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Due to non-availability of prices of agricultural produce, political leaders in Arai are banned from villages
Nashik Rain Update : व्यावसायिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाळी वस्तूंची बाजारपेठ मंदावली

यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, तालुका उपाध्यक्ष केशव सूर्यवंशी ,युवा आघाडी तालुका अध्यक्ष नयन सोनवणे ,उपाध्यक्ष देविदास अहिरे, शाखाप्रमुख विजय सोनवणे, उपशाखाप्रमुख शांताराम अहिरे ,महिला आघाडी अंजनाबाई अहिरे, सरपंच दिलीप सोनवणे, माधव अहिरे ,दिलीप अहिरे,दगा सोनवणे, महेंद्र अहिरे ,गोकुळ अहिरे, दिपक सोनवणे, विलास आहिरे, विशाल सोनवणे, रवी सोनवणे ,दिनेश सोनवणे ,अशोक अहिरे, प्रशांत अहिरे, कमलेश अहिरे ,योगेश सोनवणे, नानाजी खैरनार आधी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Due to non-availability of prices of agricultural produce, political leaders in Arai are banned from villages
Nashik News : शहरात तिघांची गळफास घेत आत्महत्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com