esakal | देश नदीचा प्रवाह बदलल्याने पाणीप्रश्न गंभीर; न्यायडोंगरीसह इतर गावांना झळ

बोलून बातमी शोधा

nyaydongari rivar way
देश नदीचा प्रवाह बदलल्याने पाणीप्रश्न गंभीर; न्यायडोंगरीसह इतर गावांना झळ
sakal_logo
By
शशिकांत पाटील

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : महादेवाच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या देश नदीवरील राजदेहरे येथील धरणाच्या फुटलेल्या संरक्षण भिंतीमुळे देश नदीचा मूळ प्रवाह शिवाच्या नाल्याकडे वळाला आहे. त्यामुळे नदीच्या मूळ प्रवाहावर पिंपरी हवेली, हिंगणे, न्यायडोंगरी, गवळीवाडा येथील शेती, दूध व्यवसाय व पिण्याच्या पाण्याचे नियोजन अवलंबून असणाऱ्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.

सामूहिक प्रयत्न करून एकत्रितपणे प्रश्न सोडवा

देश नदीचा मूळ प्रवाह राजदेहरे एमआय टॅंक, हिंगणे देहरे एमआय टॅंक, न्यायडोंगरी एमआय टॅंक व न्यायडोंगरी गावातून हातगाव एमआय टॅंक असा प्रवाहित होतो. वळलेल्या प्रवाहामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचे दर वर्षी नुकसान होते. या तांत्रिक कारणाने शासनाच्या कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेले बंधारे भरण्यास विलंब लागतो. काही वेळा ते भरतही नसल्याने या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर स्वरूप धारण करतो आहे. परिसराची जैवविविधता धोक्यात येत आहे. सांड दुरुस्तीकरिता हिंगणे देहेरे, पिंपरी हवेली, नायडोंगरी येथील ग्रामस्थ, माजी सभापती विलास आहेर, माजी सभापती राजेंद्र आहेर यांनीही प्रयत्न केले. परंतु या वेळी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करून एकत्रितपणे प्रश्न सोडवावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

हेही वाचा: सोशल मिडियातून तरुणाईचा मदतीचा हात!प्लाझ्मासह अन्‍य माहिती केली जातेय अपडेट

लेखापरीक्षण गरजेचे

कोट्यवधींचा खर्च करून विविध बंधारे बांधण्यात येतात. परंतु दर वर्षी त्याचे लेखापरीक्षण होणे गरजेचे आहे. योग्य देखभाल, दुरुस्ती व त्रुटी शासनाच्या निदर्शनास येतील व होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल. तसेच नदीपात्राच्या क्षेत्राची नोंद नकाशा संबंधित तलाठी कार्यालयाकडे असणे गरजेचे आहे. नदीपात्राच्या क्षेत्राचे संरक्षण होण्यास मदत होईल.

''राजदेहरे बंधाऱ्यालगतची संरक्षण भिंत, सांड दुरुस्तीकरिता पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव, धुळे व जळगाव या विभागाकडे पूर्वीही मागणी केली. मात्र योग्य पाठपुरावा झाला नाही. या वेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल.''

-अनिल आहेर, माजी आमदार

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!