esakal | समुपदेशन वर्गच पडला कमी; आता विनाहेल्मेट चालकांचे होणार फक्त प्रबोधन
sakal

बोलून बातमी शोधा

due to the large number of without helmet drivers the counseling hall was inadequate

नाशिक हेल्मेट सक्ती : विनाहेल्मेट चालकांचे होणार फक्त प्रबोधन

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : पोलिस आयुक्तांनी जाहीर केल्याप्रमाणे गुरुवार (ता. ९) पासून विनाहेल्मेट वाहन चालकांचे वाहन जप्त करून त्यांचे वाहतूक पार्कमध्ये प्रबोधन सुरू झाले, परंतु पहिल्याच दिवशी विनाहेल्मेट वाहनचालकांची एवढी संख्या होती की, व्यवस्था अपुरी पडली. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रांत प्रबोधन करता येईल. एवढ्यावरच कारवाया झाल्या.


हेल्मेटसक्तीचा नियम असला तरी, राज्यभर कुठेही हा नियम मानवलेला नाही. नाशिकला पेट्रोलपंपावर विनाहेल्मेट पेट्रोल मिळत नसल्याने सध्या पेट्रोलपंपावर लोक हेल्मेट घालून येऊ लागले आहे. रस्त्यावर सरसकट सगळ्या नाशिककरांनी हेल्मेट घालून वाहन चालविण्याचा नियम काही अद्याप नागरिकांच्या पचनी पडलेला नाही. आयुक्त दीपक पांडे यांनी गुरुवारी शहरात रस्त्यावर विनाहेल्मेट वाहनचालकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली. शहरात सकाळी मुंबई नाका, पाथर्डी फाटा, बिटको, गंगापूर रोड अशा चार ठिकाणी पोलिसांनी विनाहेल्मेट चालकांची तपासणी सुरू केली. त्यात मोठ्या प्रमाणावर विनाहेल्मेट चालकांची वाहन ताब्यात घेत त्यांना प्रबोधनासाठी वाहतूक पार्क येथे नेण्यात आले.

हेही वाचा: नाशिक : भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांचा जल्लोष


दोन तासात प्रबोधन करायचे कसे?

मुंबई नाका येथील नाशिक फर्स्ट संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या वाहतूक पार्कमध्ये नवीन चालकांना वाहतुकीविषयी नियमांची माहिती देण्यासाठी पार्क उभारला आहे. वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यापूर्वी नवीन वाहन चालकांना येथील प्रमाणपत्र घ्यावे लागते. हेल्मेटचे महत्त्व समजून सांगण्यासाठी त्यांच्यासाठी प्रबोधन वर्गाचे नियोजन होते. पण त्या पार्कमधील विनाहेल्मेट चालकांची एवढी गर्दी झाली की, एवढ्या विनाहेल्मेट वाहनचालकांचे दोन तासात प्रबोधन करायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला. साधारण नव्वदच्या आसपास वाहनचालकांचे समुपदेशन करून उर्वरित चालकांचे प्रबोधन करण्याचा निर्णय घेत वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रबोधन केले.

हेही वाचा: नाशिक : जुळ्या चिमुकल्यांसह खाणीत आढळला बेपत्ता पित्याचा मृतदेह


समुपदेशनाला मर्यादा

रोज दुचाकीवर फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तर वाहतूक पार्कमधील समुपदेशनाला मर्यादा आहे. साधारण एकावेळी ९० लोकांचे समुपदेशन होईल एवढी क्षमता आहे. त्यामुळे शहरात तेरा पोलिस ठाणे असून, सगळीकडे कारवाई सुरू झाल्या तर दिवसभरात विनाहेल्मेट चालकांची संख्या एवढी मोठी राहील की, वाहतूक पार्क कमी पडणार आहे. त्यामुळे पहिल्या ९० विनाहेल्मेट चालकांचे समुपदेशन करून उर्वरित गर्दीचे प्रबोधन करावे लागणार आहे.

loading image
go to top